डॉ. वर्षाली माळी, एमबीबीएस, डीएनबी - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ.

प्रश्न आहे का?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभव प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञांना विचारा आणि त्वरित उत्तर मिळवा.
प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ यांना संदेश पाठवा - डॉ. वर्षाली माळी
संपूर्ण गर्भधारणा / गरोदरपण चाचणी मार्गदर्शक | कोणती, कशी वापरायची आणि अचूकता

संपूर्ण गर्भधारणा / गरोदरपण चाचणी मार्गदर्शक

कोणती | कशी वापरायची | अचूकता

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर

एमबीबीएस, डीएनबी (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र)

डिप्लोमा इन स्त्रीरोग एन्डोस्कोपी - जर्मनी

संपूर्ण गर्भधारणा / गरोदरपण चाचणी मार्गदर्शक | कोणती, कशी वापरायची आणि अचूकता
आपण गर्भवती आहोत का? या प्रश्नाने तुम्ही चिंचेत पडू शकता. जर, तुम्ही असुरक्षित संभोग केला असेल किंवा कोणत्याही गर्भनिरोधक पद्धतींचा वापर केला नसेल तर गर्भवती असण्याची शक्यता वाढते. तुमची मासिक पाळी आली नसेल किंवा शरीरात काही बदल जाणवत असतील तर ही गर्भधारणेची लक्षणे किंवा चिन्हे आहेत हे लक्षात घ्या. तसेच हा प्रश्न चिंता, कुतूहल, उत्साह आणि कधीकधी तणावदेखील सोबत आणतो. या प्रश्नाचे उत्तर लवकरात लवकर मिळवण्यासाठी घरगुती गर्भधारणा चाचणी, वैद्यकीय मूत्र चाचणी, गर्भधारणा रक्त चाचणी आणि अल्ट्रासाउंड सोनोग्राफी यांसारख्या चाचण्या फायदेशीर ठरतात.

गर्भधारण चाचणी काम कसे करते?

अल्ट्रासोनोग्राफी वगळता, इतर सर्व चाचण्या ह्युमन कोरिओनिक गोनाडोट्रोपिन (एचसीजी) हे ग्रंथीसत्व (हार्मोन) शोधण्याचे काम करतात. हे ग्रंथीसत्व (हार्मोन) केवळ गर्भावस्थेतच शरीरात आढळून येते. बीजांड व शुक्राणू यांचा संयोग झाल्यानंतर साधारण सहा ते बारा दिवसांनी फलित अंडे स्रीच्या गर्भाशयाच्या अस्तराला चिकटते. फलित अंड्याच्या पेशी एचसीजी तयार करतात जे आपल्या शरीरात वेगाने तयार होते. हे गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काही आठवड्यांत दर २ ते ३ दिवसांनी दुप्पट होते आणि ८ ते १२ आठवड्यांपर्यंत सर्वोच्च पातळी गाठते. गर्भधारणा चाचण्यांमध्ये लघवी आणि रक्तातून हे ग्रंथीसत्व (हार्मोन) शोधले जाते.

गर्भधारणा चाचणी कधी करावी?

मासिक पाळी लांबल्यानंतर कोणत्याही वेळी तुम्ही गर्भधारणा चाचणी करू शकता. कारण त्याचवेळी या चाचण्या सर्वोत्तम काम करतात. मासिक पाळी चुकल्याच्या साधारण पहिल्या दिवसानंतर गर्भधारणा चाचणीतून अचूक परिणाम मिळण्याची शक्यता असते. तसेच मासिक पाळी चुकल्यानंतर कमीतकमी एक आठवडा वाट पाहणेदेखील योग्य ठरते. यावेळीदेखील तुम्हाला गर्भधारणा चाचणीचा अचूक निकाल मिळू शकतो. मासिक पाळी न येण्याच्या आधी गर्भधारणा चाचणी केल्यास त्याचे अचूक परिणाम येण्याची शक्यता कमी असते. कधीकधी असुरक्षित संभोग केल्यानंतर साधारण दहा दिवसांपर्यंत गर्भधारणा चाचणी केली तरीही आपल्या लघवीतून एचसीजी हे ग्रंथीसत्व (हार्मोन) शोधून काढते. परंतु, हा निकाल विश्वासार्ह नसतो. त्यामुळे आपण खरंच गर्भवती आहोत की नाही हे आपल्याला समजू शकत नाही.
गर्भधारणा चाचणी ‘ह्युमन कोरिओनिक गोनाडोट्रोपिन’ (एचसीजी) हे ग्रंथीसत्व (हार्मोन) शोधण्याचा काम करते. स्त्रीच्या शरीरात हे ग्रंथीसत्व (हार्मोन) गर्भावस्थेत वेगाने तयार होत असते. हे ग्रंथीसत्व गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काही आठवड्यांत दर २ ते ३ दिवसांनी दुप्पट होते आणि ८ ते १२ आठवड्यांत सर्वोच्च पातळी गाठते.
या लेखाची प्रत डाउनलोड करा, ठेवा आणि शेअर करा.

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ

डॉ. वर्षाली माळी या पुण्यातील स्त्रीरोगतज्ञ व प्रसूतीतज्ञ आहेत. त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथून एम.बी.बी.एस. आणि जहांगीर रुग्णालय, पुणे येथून डी.एन.बी. (प्रसूती व स्त्रीरोग) पूर्ण केले आहे. तसेच जर्मनीतील युनिव्हर्सिटी ऑफ श्लेसविग-होलस्टिन, कील येथून स्त्रीरोगीय एन्डोस्कोपी विषयातील डिप्लोमा प्राप्त केला आहे.
हिंजवडी-मरुंजी येथील लाइफ रिपब्लिक टाउनशिपमधील त्यांच्या क्लिनिकमध्ये त्या महिलांसाठी शांत, समजून घेणारं आणि विश्वास देणारं वातावरण निर्माण करतात. रुग्णाचं म्हणणं नीट ऐकून घेणं, सौम्य शब्दांत समजावून सांगणं आणि योग्य वाटेल असं मार्गदर्शन देणं - हाच त्यांच्या उपचारपद्धतीचा केंद्रबिंदू आहे.
नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल
नोंदणी क्र. २००६११३३७४

सूचना

हा लेख केवळ सामान्य आरोग्यजागृतीसाठी आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही. प्रत्येक रुग्णाची परिस्थिती वेगळी असते; कृपया योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय सोशल मीडियावर फॉलो करा
सोशल मीडियावर फॉलो करा - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय

नवीन आरोग्य सूचना मिळवायच्या आहेत?

सोशल मीडियावर फॉलो करा

डॉ. वर्षाली माळी या स्त्रीरोग, प्रसूती, मुलींचे प्रौढत्व आणि महिलांचे आरोग्य विषयांवर लिहितात. आम्ही आमच्या रूग्ण आणि समुदायामध्ये आरोग्य विषयक जागरूकता पसरवण्यासाठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरतो.
अपडेट राहण्यासाठी आणि डॉ. वर्षाली माळी यांच्याकडून शिक्षण, आरोग्य सूचना इत्यादी मिळवण्यासाठी खालील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आम्हाला फॉलो करा.
डॉ. वर्षाली माळी यांच्या आरोग्यविषयक सूचनांचे सदस्य व्हा
सदस्य व्हा आणि डॉ. वर्षाली माळी यांच्याकडून प्रसूती, स्त्रीरोग आणि महिलांच्या आरोग्यावर सूचना मिळवा.

सदस्य व्हा

आणि डॉ. वर्षाली माळी यांच्याकडून आरोग्यविषयक सूचना मिळवा.

स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात. लहानपणापासून, किशोरवयीन, प्रौढ, प्रौढ स्त्रीपर्यंत, तिला आरोग्याच्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. डॉ. वर्षाली माळी अनेक समस्यांचे निराकरण करण्याचा आणि आरोग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात. आमची सदस्यता घ्या आणि डॉ. वर्षाली माळी यांच्याकडून आरोग्यविषयक सूचना मिळवा.
तुमची सदस्यता जतन केली जाऊ शकली नाही. कृपया पुन्हा प्रयत्न करा.
तुम्ही डॉ. वर्षालीच्या स्त्रीरोग चिकित्सालयाच्या आरोग्य अपडेट्सचे यशस्वीपणे सदस्यत्व घेतले आहे.
सदस्यत्व घेऊन, मी डॉ. वर्षालीच्या स्त्रीरोग चिकित्सालयाकडून शैक्षणिक आरोग्यविषयक अपडेट्स ईमेलद्वारे मिळवण्यास संमती देते.
डॉ. वर्षाली माळी, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर यांना प्रश्न विचारा

प्रश्न आहे?

प्रसूती, मासिक पाळी किंवा तुमच्या आरोग्याबद्दल काही शंका आहे? तुमचा प्रश्न आम्हाला पाठवा. समजून घेण्यासाठी आम्ही सर्वसाधारण माहिती देऊ. तुमच्या स्वतःच्या परिस्थितीबाबत सल्ल्यासाठी प्रत्यक्ष भेट घेणे योग्य ठरेल.
डॉ. वर्षाली माळी, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करा

चला बोलूया

तुम्ही नियोजन करत असाल, गर्भवती असाल किंवा काही शंका असेल – डॉ. वर्षाली माळी, प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ, हिंजवडीतील लाइफ रिपब्लिक येथील त्यांच्या क्लिनिकमध्ये तुम्हाला भेटतात. सोमवार ते शनिवार.
भाषा बदला. - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय