डॉ. वर्षाली माळी, एमबीबीएस, डीएनबी - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ.

प्रश्न आहे का?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभव प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञांना विचारा आणि त्वरित उत्तर मिळवा.
प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ यांना संदेश पाठवा - डॉ. वर्षाली माळी
घरगुती गर्भधारणा / गरोदरपणा चाचणी - केव्हा आणि कशी करावी व अचूकता

घरगुती गर्भधारणा / गरोदरपणा चाचणी

किती लवकर द्यावी | स्तर | प्रकार | अचूकता

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर

एमबीबीएस, डीएनबी (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र)

डिप्लोमा इन स्त्रीरोग एन्डोस्कोपी - जर्मनी

घरगुती गर्भधारणा / गरोदरपणा चाचणी - केव्हा आणि कशी करावी व अचूकता
असुरक्षित संभोग केला असेल, पाळी चुकली असेल तसेच कोणत्याही गर्भनिरोधक पद्धतींचा वापर केला नसेल तर आपण गर्भवती होऊ शकतो हा विचार अनेकदा मनात येतो आणि त्याचे उत्तर शोधण्याची इच्छादेखील तीव्र होते. तसेच आपल्या गर्भधारणेविषयी सद्यस्थितीत कुणालाही माहिती देण्याची इच्छा नसते. परंतु, आपल्या माहितीसाठी आणि आवश्यकता म्हणून हे जाणून घेणे महत्त्वपूर्ण वाटत असेल तर घरगुती गर्भधारणा चाचणी हा एक सोपा मार्ग आहे. आपण गर्भवती आहोत की नाही याची खात्री करण्यासाठी या घरगुती गर्भधारणा चाचणीचा तुम्ही वापर करू शकता. ही चाचणी आपल्या लघवीत एचसीजी ग्रंथीसत्व (हार्मोन) शोधण्याचे काम करते. गर्भधारणा झाल्यानंतरच हे ग्रंथीसत्व (हार्मोन) शरीरात तयार होत असते.

घरगुती गर्भधारणा चाचणी कशी करावी?

बहुतांश मेडिकल स्टोअर्समध्ये घरगुती गर्भधारणा चाचणी संच उपलब्ध होतो. शिवाय हे संच आपल्या खिशाला परवडतील या किंमतीचे असतात. तसेच तुमच्या डॉक्टरांकडेदेखील हे संच उपलब्ध होऊ शकतात. घरगुती गर्भधारणा चाचणी लघवीचा नमुना घेऊन करावी लागते. यामध्ये लघवी एका कपमध्ये भरून त्यात गर्भधारणी चाचणी संचामध्ये दिलेली पट्टी बुडवता येते किंवा लघवीच्या प्रवाहात ही पट्टी धरावी लागते. गर्भवती असल्यास चाचणी पट्टी रंगीत रेषा तयार करते. परंतु, ही निकालदर्शक पद्धती आपण कोणत्या कंपनीची किंवा ब्रँडचा संच वापरतोय त्यावर हे अवलंबून असते. त्यामुळे आपण खरेदी केलेल्या संचावरील सूचना पूर्णपणे आणि बारकाईने वाचून त्यांचे काळजीपूर्वक अनुसरण करायला हवे.

घरगुती गर्भधारणा चाचणी कधी करावी?

मासिक पाळी आली नाही किंवा पाळी येण्यास उशीर झाला असेल तर ही घरगुती गर्भधारणा चाचणी करता येते. हा कालावधी गर्भधारणा चाचणी करण्यासाठी योग्य ठरतो. कारण, या काळात घरगुती गर्भधारणा चाचणीचा निकाल बहुतांश प्रमाणात अचूक असतो. मासिक पाळीची तारीख गेल्यानंतर पहिल्याच दिवशी चाचणी केल्यास अचूक निकाल मिळतो. परंतु, मासिक पाळी चुकल्यानंतर साधारण एक आठवडा थांबायला हवे जेणेकरून गर्भधारणा चाचणीचा निकाल अधिक अचूक येण्याची शक्यता असते. काही गर्भधारणा चाचणी संचांबाबत सांगितले जाते की, ते मासिक पाळी चुकण्याचा काही दिवस आधी कार्य करतात. परंतु, त्यांच्यादेखील परिणामाची अचूकता सहसा कमी असते. असुरक्षित संभोगानंतर दहा दिवसांच्या आत घरगुती गर्भधारणा चाचणी केली तर त्यात एचसीजी हे ग्रंथीसत्व (हार्मोन) आढळू शकतात. परंतु, हे परिणाम पूर्णपणे विश्वासार्ह ठरत नाहीत. यातून चुकीचा निकाल मिळण्याची चिन्हे अधिक असतात. जर तुमची मासिक पाळी अनियमित असेल किंवा काही कारणास्तव मासिक पाळीमध्ये अडथळे येत असतील तर, अचूक परिणामांसाठी अचूक वेळ म्हणजे लैंगिक संबंधानंतर ३ आठवड्यांनी गर्भधारणा चाचणी करणे हा आहे.

घरगुती गर्भधारणा चाचणीच्या निकालांची अचूकता कशी असते?

अचूकतेसह चाचणीचा निकाल मिळवण्यासाठी मध्यप्रवाहातील लघवी वापरण्याची शिफारस केली जाते. याचा अर्थ असा असतो की, लघवीचा नमुना गोळा करण्यासाठी किंवा गर्भधारणा चाचणी पट्टीवर नमुना घेण्याआधी प्रथम शौचालयात लघवी करून त्यानंतर कपमध्ये किंवा पट्टीवर लघवी करावी. तसेच चाचणीसाठी सकाळच्या वेळी पहिल्या लघवीचा नमुना घेतल्यास चाचणीचा अचूक परिणाम दिसतो. जर तुम्ही गर्भवती असाल तर, त्यात जास्त एचसीजी असेल. गर्भधारणा चाचणी संच कालबाह्य (एक्सपायर) म्हणजे त्याची वापर करण्याची मुदत संपल्यानंतर वापरला किंवा योग्यप्रकारे वापरला नाही तर, त्याच्या अचूकतेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे योग्य व अचूक निकाल मिळण्यासाठी गर्भधारणा चाचणी संचावरील कालबाह्यता म्हणजे एक्सपायरी तारीख नेहमी तपासून घ्यावी आणि संच वापरण्यासंदर्भात असलेल्या सर्व सूचनादेखील काळजीपूर्वक वाचून घ्याव्यात.

चुकीचे सकारात्मक आणि चुकीचे नकारात्मक परिणाम म्हणजे काय?

एखादवेळी तुम्ही गर्भवती असू शकता, परंतु तुमचा गर्भधारणा चाचणीचा निकाल निगेटिव्ह म्हणजेच नकारात्मक येतो. यालाच चुकीचा नकारात्मक निकाल असे म्हणतात. आपण चाचणी योग्यरित्या केली नाही किंवा चाचणी खूप लवकर केली असेल तर हे होऊ शकते. अशावेळी, जर तुमची मासिक पाळी काही दिवसांच्या अंतराने आली नाही तर चाचणी पुन्हा करायला हवी आणि आपल्या स्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यायला हवा. तसेच एखादवेळी तुम्ही गर्भवती नसता परंतु चाचणीमध्ये पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक निकाल येतो. यालाच चुकीचा सकारात्मक निकाल असे म्हणतात. जर तुम्ही चाचणी संच कालबाह्य तारखेनंतर वापरला असेल किंवा तुम्हाला वंध्यत्व उपचारादरम्यान एचसीजी इंजेक्शन दिले असेल तर हे होऊ शकते. कर्करोग किंवा इतर वैद्यकीय परिस्थितींमध्ये एचसीजी पातळी उच्च होऊ शकते. ज्यामुळे चुकीचा सकारात्मक गर्भधारणा चाचणी परिणामदेखील दिसू शकतो.
जर गर्भधारणा चाचणी निकाल सकारात्मक असतील किंवा तुम्हाला निकालाबद्दल काही संभ्रम असेल तर चाचणीच्या निकालांची खात्री करण्यासाठी प्रसुतितज्ज्ञ किंवा स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. अशावेळी डॉक्टर तुम्हाला पुन्हा मूत्र गर्भधारणा चाचणी करण्यास सांगू शकतात किंवा रक्त चाचणी करण्याचाही सल्ला देऊ शकतात. त्यामुळे प्रसुति किंवा स्त्रीरोग तज्ज्ञांशी चर्चा करून आपल्या घरगुती गर्भधारणा चाचणीचीही खात्री करून घ्यावी.

वैद्यकीय मूत्र गर्भधारणा चाचणी म्हणजे काय?

वैद्यकीय मूत्र गर्भधारणा चाचणी घरगुती गर्भधारणा चाचणीपेक्षा वेगळी नसते आणि ती अधिक अचूक देखील नसते. तरीही, प्रसुति किंवा स्रीरोग तज्ज्ञ दवाखान्यात केलेल्या चाचणी निकालांच्या अचूकतेवर परिणाम करू शकणाऱ्या संभाव्य त्रृटी दूर करण्यात मदत करू शकतात. या परिणामांच्या आधारे पुढील पाऊल काय असावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेता येतो.
घरगुती गर्भधारणा चाचणी गुणात्मक स्वरुपाची असते आणि आपण गर्भवती आहोत की नाही हे आपल्याला सांगते. मात्र, यावरून तुम्ही किती दिवसांपासून गर्भवती आहात हे सांगता येत नाही. मासिक पाळी चुकल्यानंतर साधारण एक आठवड्यानंतर सकाळच्यावेळी लघवीच्या मध्यप्रवाहातील नमुना चाचणीसाठी घेतला जातो. तेव्हा तिची अचूकता अधिक प्रमाणात येते. त्यामुळेच खात्रीशीर निकाल येण्यासाठी दोनदा चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. घरगुती गर्भधारणा चाचणीची खात्री करण्यासाठी प्रसुति किंवा स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
या लेखाची प्रत डाउनलोड करा, ठेवा आणि शेअर करा.

सदस्य व्हा

आणि डॉ. वर्षाली माळी यांच्याकडून आरोग्यविषयक सूचना मिळवा.

तुमची सदस्यता जतन केली जाऊ शकली नाही. कृपया पुन्हा प्रयत्न करा.
तुम्ही डॉ. वर्षालीच्या स्त्रीरोग चिकित्सालयाच्या आरोग्य अपडेट्सचे यशस्वीपणे सदस्यत्व घेतले आहे.

गर्भधारणा गणक / कैलक्युलेटर

गर्भधारणेच्या महत्त्वाच्या तारखांचा अचूक अंदाज लावा

कॅलेंडर आयकॉन - गर्भधारणेची अंतिम तारीख कॅल्क्युलेटर - डॉ. वर्षाली माळी - स्त्रीरोगतज्ज्ञ

अचूक प्रसव तिथि अथवा बाळाच्या आगमनाची तारीख जाणून घ्या

बाळाच्या आगमनाची अपेक्षा करत आहात आणि बाळंतपणाची तारीख जाणून घ्यायची आहे? आठवड्यानुसार, महिन्यानुसार आणि गर्भधारणेच्या प्रगती स्थितीनुसार, या कॅल्क्युलेटर / गणक चा वापर करून अचूक प्रसव तिथि जाणून घ्या.
ओव्हुलेशन कालावधी आयकॉन - डॉ. वर्षाली माळी - स्त्रीरोग तज्ञ

गर्भवती होण्यासाठी सर्वोत्तम प्रजनन दिवस जाणून घ्या

गर्भवती होऊ इच्छिता? तुमचे सर्वोत्तम प्रजनन दिवस जाणून घेऊ इच्छिता? तुमचा ओव्हुलेशन / स्त्रीबिजांचा कालावधी, लक्षणे आणि गर्भधारणेसाठीचे सर्वोत्तम दिवस जाणून घेण्यासाठी हे ओव्हुलेशन गणक / कॅल्क्युलेटर वापरा.

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ

डॉ. वर्षाली माळी या प्रसुती शास्त्र आणि स्त्रीरोग शास्त्रात प्रवीण असून या क्षेत्रात कार्यरत आहेत. पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर डीएनबी (प्रसुतिशास्त्र व स्त्रीरोग शास्त्र) यामध्ये जिहांगीर हॉस्पिटल पुणे येथून पद्व्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच युनिवर्सिटी ऑफ श्लेस्विग होलस्टाइन, जर्मनी येथून गायनेकॉलॉजीकल एन्डोस्कोपी या विषयात डिप्लोमा पूर्ण केला आहे. प्रसुती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून त्यांना अनेक वर्षांचा गाढा अनुभव आहे. तसेच या विषयात त्या व्याख्याता म्हणूनदेखील मार्गदर्शन करतात. पुण्यातील मारुंजी येथील लाइफ रिपब्लिक टाउनशिपमध्ये त्यांचे चिकित्सालय असून हिंजवडी, वाकड आणि उपनगरांतील स्त्रियांना त्या वैद्यकीय सेवा देतात. हसतमुख आणि आश्वासक स्वभाव, प्रसुती आणि स्त्रीरोगांविषयी सखोल ज्ञान यामुळे स्त्रियांना त्यांचे मार्गदर्शन फायदेशीर आणि मदत करणारे ठरते आहे. डॉ. वर्षाली या दोन मुलींच्या आई असून मातृत्व ही सर्वांगसुंदर भेट असल्याचे त्या मानतात. आपले ज्ञान आणि शिक्षणाचा स्त्रियांना फायदा व्हावा यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.

प्रश्न?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूती डॉक्टरांना विचारा आणि उत्तरे मिळवा.

अपॉइंटमेंट

डॉ. वर्षाली माळी या अनुभवी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आहेत. तिच्यासोबत भेटीची वेळ बुक करा आणि सर्वोत्तम सल्ला, काळजी आणि उपाय मिळवा.
भाषा बदला. - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय