डॉ. वर्षाली माळी, एमबीबीएस, डीएनबी - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ.

प्रश्न आहे का?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभव प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञांना विचारा आणि त्वरित उत्तर मिळवा.
प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ यांना संदेश पाठवा - डॉ. वर्षाली माळी
बाळंतपणाची तारीख गणक / कैलक्युलेटर - अचूक प्रसव तिथि जाणून घ्या

बाळंतपणाची तारीख गणक / कैलक्युलेटर

अचूक प्रसव तिथि अथवा बाळाच्या आगमनाची तारीख जाणून घ्या

सल्लागार

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर

एमबीबीएस, डीएनबी (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र)

डिप्लोमा इन स्त्रीरोग एन्डोस्कोपी - जर्मनी

बाळंतपणाची तारीख गणक / कैलक्युलेटर - अचूक प्रसव तिथि जाणून घ्या
बाळाच्या आगमनाची अपेक्षा करत आहात आणि बाळंतपणाची तारीख जाणून घ्यायची आहे? आठवड्यानुसार, महिन्यानुसार आणि गर्भधारणेच्या प्रगती स्थितीनुसार, या कॅल्क्युलेटर / गणक चा वापर करून अचूक प्रसव तिथि जाणून घ्या.

बाळंतपणाची तारीख गणक / कैलक्युलेटर

आठवड्यानुसार, महिन्यानुसार आणि गर्भधारणेच्या प्रगती स्थितीनुसार, अचूक प्रसव तिथि जाणून घ्या.

प्रसुतीची (डिलीव्हरी) तारीख कशी काढावी?

सामान्य गर्भावस्था ही अंदाजे ४० आठवडे किंवा २८० दिवसांची असते. या काळाच्या अंदाजानुसार प्रसव तिथी म्हणजे प्रसुती (डिलीव्हरी) तारीख ठरवली जाते. आपल्याला उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे आणि प्रसव तिथी गणकाच्या आधारे आपण प्रसुतीची तारीख काढू शकतो. प्रसुतीची तारीख काढण्याचा सोपा मार्ग म्हणजे आपल्या मागील मासिक पाळीच्या पहिल्या तारखेपासून मोजणीला सुरुवात करणे. आपल्या मागील मासिक पाळीच्या पहिल्या दिवसात ४० आठवडे म्हणजे २८० दिवस जोडा म्हणजे तुम्हला तुमची प्रसूतीची तारीख मिळून जाईल. यातील अजून एक पर्याय म्हणजे मागील मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून मोजणी सुरू करणे. मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून सात दिवस मिळवा आणि तेथून मागील तीन महिन्यांपर्यंत मोजणी करा. उदाहरणार्थ, मागील पाळी २० ऑक्टोबरला आली असल्यास त्यात सात दिवस मिळवा. यानुसार तारीख येते २७ ऑक्टोबर. या २७ ऑक्टोबरमधून तीन महिने वजा केल्यानंतर प्रसुतिची तारीख येते २७ जुलै.
काहीवेळा प्रसूती तज्ज्ञ स्त्रीच्या गर्भाशयाच्या आकारावरून प्रसुती तारखेचा अंदाज लावू शकतात. गर्भावस्थेच्या १२ आठवड्यांत गर्भाशय हे ओटीपोटाच्या वर आलेले जाणवते. सुमारे १८ आठवड्यांनंतर गर्भाशयाचा वरचा भाग (फंडस) आणि जांघेचे हाड (प्युबिक बोन) या दोघांमधील अंतर हे मागील मासिक पाळीपासूनच्‍या आठवड्या इतके असते. यावरूनही स्रीरोग तज्ज्ञ प्रसुती तारखेचा अंदाज लावू शकता. गर्भाशयाच्या आकारावरून गर्भधारणेचा आठवडा मोजण्यासाठी अशा अनेक पद्धती आहेत.
जर तुम्हाला मासिक पाळीची नेमकी पहिली तारीख ठाऊक नसेल किंवा ओव्हुलेशन म्हणजेच बीजकोश फूटून जननपेशी बाहेर पडली असेल तर अल्ट्रासाउंड पद्धती गर्भधारणेच्या आठवड्याचा अंदाज लावण्यास मदत करू शकते. यामध्ये अल्ट्रासाउंड डिव्हाइस स्क्रीनवर प्रतिमा तयार करण्यासाठी ध्वनीलहरी पाठवते, ते शरीराच्या अंतर्गत रचना आणि गर्भशिशूची वाढ आणि आरोग्य पाहण्यास मदत करते.
प्रसुतिच्या तारखेचा अंदाज लावण्यासाठी अशा काही पद्धतींचा वापर केला जातो. गर्भधारणेची अचूक तारीख आणि त्याविषयी घ्यायची खबरदारी याबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या प्रसूती तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

प्रसूती तारखेमध्ये बदल होऊ शकतो का?

होय, वास्तविक तारीख आणि प्रसव तिथी गणकाचा अंदाज वेगवेगळा असू शकतो. आपल्या बाळाचा जन्म कधी होणार याची अचूक माहिती मिळणे हे विविध घटकांवर अवलंबून असते. भ्रूण वाढ, पोटाचा आकार (फंडल हाइट), गर्भशिशूने बनवलेल्या अल्फा-फेटोप्रोटीनची पातळी (एएफपी) इत्यादी अंदाज जर थोडे चुकीचे किंवा वेगवेगळे असतील तर गणकाने काढलेली प्रसुतिची तारीख बदलू शकते. मासिक पाळी अनियमित असल्यास किंवा आपली प्रारंभिक अल्ट्रासाऊंड प्रक्रियेने काढलेली तारीख चुकीची असल्यास , प्रसव तिथीचे गणित चुकू शकते. प्रसुतिची तारीख आपल्या बाळाच्या आगमनाचे केवळ एक सूचक असते. अचूक आगमनाचा दिवस जाणून घ्येण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टींचा मागोवा ठेवावा लागतो. म्हणूनच, आपल्या आणि गर्भशिशूच्या आरोग्यासाठी आपल्या प्रसूती तज्ज्ञांचा नियमित सल्ला घ्या.

गर्भावस्थेची सुरुवातीची लक्षणे

आपण गर्भवती आहोत असा विचार मनात येण्याची अनेक कारणे आहेत. मासिक पाळी चुकणे, पाळी येण्यास उशीर होणे, गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास विसरणे, अथवा कोणत्याही गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करण्यास विसरणे, अशी अनेक करणे हा प्रश्न उध्दभवू शकतात. शरीरात काही बदल जाणवणे हे गर्भधारणेचे सर्वात सामान्य पहिले लक्षण आहे. सकाळच्यावेळी थकवा जाणवणे, हलका रक्तस्त्राव होणे, स्तनात बदल इत्यादी गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळातील काही लक्षणे आहेत. गर्भावस्थेची सुरुवातीची लक्षणे आणि त्यांचा अर्थ काय आहे हे समजून घेण्यासाठी हा लेख वाचा.

गर्भधारणा चाचणी

“मी गर्भवती आहे का?” हा प्रश्न अनेक बदल आणि घटनांमुळे उद्भवू शकतो. तुम्ही कोणत्याही प्रकारची गर्भनिरोधक पद्धती वापरली नाही किंवा तुमची मासिक पाळी चुकल्यास हा प्रश्न गहन होतो. तुमच्या शरीरात होणारे बदल ह्या प्रश्नाला आजून गंभीर बनवू शकतात. आमचे संपूर्ण गर्भधारणा मार्गदर्शक सर्व चाचण्यांचा तपशील देते. ज्यात घरगुती गर्भधारणा चाचण्या, मूत्र गर्भधारणा चाचण्या, गर्भधारणेच्या रक्त चाचण्या आणि अल्ट्रासाऊंड/सोनोग्राफी स्कॅन चाचण्या यांचा समावेश आहे. प्रसव तिथी गणकात आपल्या मागील मासिक पाळीच्या पहिल्या दिवसाची माहिती असणे आवश्यक असते. म्हणूनच, मासिक पाळीची अचूक तारीख माहित नसल्यास, अल्ट्रासाऊंड गर्भधारणा चाचणी प्रसव तिथीचा अंदाज घेण्यास आणि गर्भशिशूचे आरोग्य समजण्यास मदत करू शकते.

गर्भावस्था तपासणीचे वेळापत्रक

आपल्याला प्रसव तिथी गणकामुळे बाळाच्या जन्माची अंदाजे तारीख माहित होते. आपण गर्भवती असल्याचे समजल्यापासून ते प्रसुती होईपर्यंतचा प्रवास रोमांचक आहे. तसेच त्यात बरेच महत्त्वपूर्ण टप्पे आहेत. निरोगी आणि आनंददायक गर्भधारणेसाठी, प्रसुतिपूर्व तपासणी आणि चाचणी वेळापत्रकाचे अनुसरण करणे महत्वाचे आहे. आपल्या गर्भावस्था तपासणीच्या वेळा, अल्ट्रासाऊंड स्कॅन हे आपल्यासाठी आणि आपल्या शिशूच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. या लेखात गर्भावस्था तपासणी वेळापत्रक, गर्भावस्था भेटीच्या वेळा, गर्भधारणा अल्ट्रासाऊंड स्कॅनचा प्रकार आणि त्याचे वेळापत्रक याबद्दल तपशील समाविष्ट आहेत.

गर्भावस्था लसीकरण

गर्भधारणेमुळे स्त्रीच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्तीमध्ये बदल होतात आणि यामुळे स्त्रिया संसर्गजन्य रोगांना अधिक बळी पडू शकतात. हे आजार गर्भाशय, भ्रूण आणि नंतर नवजात शिशूवर विपरित परिणाम करणारे ठरतात. गर्भावस्थेतील लसीकरण हे गर्भवतीला गंभीर संसर्गजन्य रोगांशी लढण्यासाठी, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी, प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) निर्माण करून आई आणि गर्भशिशूला संसर्गापासून वाचवण्यासाठी खूप महत्वाचे आहे. प्रसुति तारखेच्या माध्यमातून बाळाच्या आगमनाची तारीख जाणून घेतल्यानंतर, लसीकरणाचा टप्पा महत्त्वाचा असतो. आपल्यासाठी कोणकोणत्या लशी आवश्यक आहेत याची माहिती प्रत्येक गर्भवतीने घ्यायला हवी. खाली नमूद केलेल्या लेखात टीडॅप लस, टीटी इंजेक्शन, इतर लशी, त्यांचे फायदे आणि वेळापत्रक यासारखी माहिती देण्यात आली आहे.

हे ही वाचा

प्रसव तिथी गणकाने आपल्याला प्रसुति तारखेचा अंदाज काढण्यास मदत होते. आता तुम्हाला आपल्या बाळाच्या आगमनाचा दिवस अंदाजे लक्षात आला असेल. गर्भावस्था हा एक सुंदर प्रवास आहे. या काळात प्रत्येक गर्भवतीने स्वतःची आणि आपल्या येणाऱ्या बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षाली माळी यांनी लिहिलेले काही लेख खाली नमूद केले आहेत. आपला गर्भावस्था प्रवास सुखकर, सुरक्षित, निरोगी आणि आनंदादायी बनविण्यात हे लेख नक्कीच मदत करतील.
प्रसव तिथी गणक हे प्रसूतीची अंदाजे तारीख काढण्यासाठी मदत करते. हा फक्त एक अंदाज आहे. प्रसूतीच्या कळा या तारखेच्या दोन आठवडे आधी किंवा नंतर चालू होऊ शकतात. तुमची खरी प्रसूती तारीख हि तुम्ही कितीवेळा गरोदर राहिला आहात यावर देखील अवलंबून आहे. सर्वसाधारणपणे, दुसऱ्या किंवा नंतरच्या गर्भधारणेच्यावेळी, खरी प्रसूती तारीख हि अंदाजे काढलेल्या तारखेपेक्षा लवकर येते.
२० पैकी केवळ १ महिला त्यांच्या अंदाजे प्रसुती तारखेला बाळाला जन्म देते. याचा अर्थ असा आहे की केवळ ५ टक्के शिशु त्यांच्या निर्धारित तारखेस जन्माला येतात. त्यामुळे आपल्या बाळाच्या आगमनासाठी ही प्रसुतिची तारीख केवळ अंदाज म्हणून विचारात घ्या. या तारखेनुसार तुमचे सर्व काम आणि इतर जबाबदाऱ्यांचे नियोजन करणे सोपे आणि सोयीस्कर होईल. जर तुम्हाला काही शंका असतील तर तुमच्या प्रसूती तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या लेखाबद्दल किंवा या विषयाबद्दल काही प्रश्न किंवा शंका असतील तर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षाली माळी यांच्याशी विनासंकोच संपर्क साधा.

तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक

स्त्रीरोग व प्रसूतीशात्र तज्ज्ञ डॉ. वर्षाली माळी यांचा सल्ला घेऊन आमच्या टीम ने हा प्रसव तिथी गणक विकसित केले आहे. याद्वारे काढलेल्या प्रसुती तारखेची अचूकता हि दिलेल्या माहितीच्या अचूकतेवर अवलंबून आहे. वास्तविक प्रसुति तारीख अनेक घटकांवर अवलंबून आहे. आम्ही असा दावा करत नाही की, गणकाने काढलेल्या तारखेलाच आपण आपल्या बाळाला जन्म द्याल. म्हणून आमचा तुम्हला सल्ला आहे कि, आपल्या प्रसुतिची तारीख समजून घेण्यासाठी आणि योजना आखण्यासाठी आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांशी नक्की सल्लामसलत करा.

सदस्य व्हा

आणि डॉ. वर्षाली माळी यांच्याकडून आरोग्यविषयक सूचना मिळवा.

तुमची सदस्यता जतन केली जाऊ शकली नाही. कृपया पुन्हा प्रयत्न करा.
तुम्ही डॉ. वर्षालीच्या स्त्रीरोग चिकित्सालयाच्या आरोग्य अपडेट्सचे यशस्वीपणे सदस्यत्व घेतले आहे.

लेखक

टीम

डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय

आपल्या रुग्णांना अधिक चांगली सुविधा देण्यासाठी ‘टीम डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय’ प्रयत्नशील आहे. रुग्णांपर्यंत सुविधा पोहोचविण्यासाठी संपूर्ण टीम एकसंघ होऊन काम करते. ही टीम विविध डिजिटल उपक्रमांचे काम करते. जसे की, अपॉइंटमेंट बूक करणे, वेबसाइट आणि सोशल मीडियावर माहिती उपलब्ध करून देणे. याचबरोबर चिकित्सालया मध्येदेखील ही टीम रुग्णांच्या सेवेसाठी सदैव कार्यरत असते. तेथे आलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना येथे काही अडचण येऊ नये यासाठी टीम प्रयत्नशील असते.
टीम आणि त्यांच्या कामाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आमचे चिकित्सालय, आमच्या वेबसाइटला भेट द्या किंवा सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करा. तुम्हाला माहिती देण्यात आणि तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्यात टीमला नक्कीच आनंद होईल.

प्रश्न?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूती डॉक्टरांना विचारा आणि उत्तरे मिळवा.

अपॉइंटमेंट

डॉ. वर्षाली माळी या अनुभवी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आहेत. तिच्यासोबत भेटीची वेळ बुक करा आणि सर्वोत्तम सल्ला, काळजी आणि उपाय मिळवा.
भाषा बदला. - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय