गर्भधारणा / गरोदरपणा चाचणीचे नकारात्मक परिणाम मिळाल्यानंतर पुढे काय करायचे ?
पर्याय | खोटे नकारात्मक परिणाम | चुकलेली मासिक पाळी
लेखक
डॉ. वर्षाली माळी
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर
एमबीबीएस, डीएनबी (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र)
एमबीबीएस, डीएनबी (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र)
डिप्लोमा इन स्त्रीरोग एन्डोस्कोपी - जर्मनी
डिप्लोमा इन स्त्रीरोग एन्डोस्कोपी - जर्मनी
या लेखात
गर्भधारणा चाचणी नकारात्मक असल्यास पुढे काय?
आपल्या नकारात्मक गर्भधारणा चाचणी निकालानंतर, आपल्याला मुल हवे की नाही यावर पुढील पाऊल अवलंबून असते.
तुम्हाला मुल हवे असल्यास...
जर तुम्हाला मुल हवे असेल तर गर्भधारणा होण्यासाठी प्रयत्न करीत राहा. केवळ लैंगिक संबंध ठेवल्यानेच गर्भवती होण्याची शक्यता वाढणार नाही. तर आपल्या मासिक पाळीचा आढावा घेत राहा. गर्भधारणा होण्यासाठी योग्य वेळ केव्हा आहे हे ठरवण्यासाठी कॅलेंडरवर लक्ष ठेवा. जर तुम्ही खूप काळापासून गर्भवती होण्याचा प्रयत्न करीत असाल तर, डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर तुम्हाला योग्य तो सल्ला देतील आणि भविष्यात काय निर्णय घ्यावे याविषयी मार्गदर्शन करतील.
जर तुम्हाला मुल नको असेल तर
अशावेळी फार करण्याची गरज नाही. आपण गर्भवती नाही याची खात्री करण्यासाठी पुन्हा एकदा चाचणी करण्याचा दिला जातो. असुरक्षित संभोगानंतर गर्भधारणेच्या चिंतेतून चाचणी केली असले तर गर्भधारणा रोखण्यासाठी आवश्यक गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करण्याचा प्रयत्न करा. गर्भनिरोध आणि कुटुंब नियोजनाच्या सल्ल्यासाठी स्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
चुकीचा नकारात्मक गर्भधारणा चाचणी निकाल
काहीवेळा तुम्ही गर्भवती असू शकता, परंतु तुमच्या गर्भधारणा चाचणीचा निकाल नकारात्मक येतो. जर तुम्ही घरगुती गर्भधारणा चाचणी खूप लवकर केली किंवा योग्यरित्या केली नसेल तर सहसा असे घडते. जर तुम्ही काही विशिष्ट औषधे घेत असाल तर गर्भधारणा चाचणीचा निकाल नकारात्मक येऊ शकतो. सामान्यतः तुम्ही आतापर्यंत गर्भधारणेच्या लक्षणांचा अनुभव घेत असाल तर ही चिंतेची बाब असू शकते. विशेषतः तुमची मासिक पाळी चुकली असेल तर शंका दाट होते. तुम्ही जी गर्भधारणेची लक्षणे अनुभवत आहात याचे काही वेगळे कारण आहे का, हे जाणून घेण्यासाठी गर्भधारणा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
या लेखाची प्रत डाउनलोड करा, ठेवा आणि शेअर करा.
डॉ. वर्षाली माळी, एम.बी.बी.एस., डी.एन.बी. (प्रसूती व स्त्रीरोग), या पुण्यातील स्त्रीरोगतज्ज्ञ असून त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू म्हणजे स्त्रीला समजून घेणारी, संवेदनशील आणि व्यक्तिगत-स्पर्शातून दिली जाणारी काळजी. प्रत्येक स्त्रीचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं, तिच्या भावनांना मान देणं आणि तिला स्पष्ट व सहानुभूतिपूर्ण मार्गदर्शन मिळावं, यावर त्या विशेष भर देतात.
डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. आणि जहांगीर रुग्णालयातून डी.एन.बी. पदवी मिळवून, जर्मनीतील स्त्रीरोगीय एंडोस्कोपी डिप्लोमामुळे त्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक समृद्ध झाला आहे. हिंजवडी–मारुंजी परिसरातील लाइफ रिपब्लिक टाउनशिपमधील त्यांच्या क्लिनिकमध्ये त्या महिलांसाठी आणि होणाऱ्या पालकांसाठी आपलेपणाची ऊब, साधेपणा आणि विश्वास देणारं वातावरण निर्माण हेच त्यांचं सातत्यपूर्ण ध्येय आहे.
सूचना
हा लेख केवळ सामान्य आरोग्यजागृतीसाठी आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही. प्रत्येक रुग्णाची परिस्थिती वेगळी असते; कृपया योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सदस्य व्हा
आणि डॉ. वर्षाली माळी यांच्याकडून आरोग्यविषयक सूचना मिळवा.
गर्भधारणा गणक / कैलक्युलेटर
गर्भधारणेच्या महत्त्वाच्या तारखांचा अचूक अंदाज लावा
बाळंतपणाची तारीख गणक / कैलक्युलेटर
अचूक प्रसव तिथि अथवा बाळाच्या आगमनाची तारीख जाणून घ्या
बाळाच्या आगमनाची अपेक्षा करत आहात आणि बाळंतपणाची तारीख जाणून घ्यायची आहे? आठवड्यानुसार, महिन्यानुसार आणि गर्भधारणेच्या प्रगती स्थितीनुसार, या कॅल्क्युलेटर / गणक चा वापर करून अचूक प्रसव तिथि जाणून घ्या.
ओव्हुलेशन / स्त्रीबिजांचा कालावधी
गर्भवती होण्यासाठी सर्वोत्तम प्रजनन दिवस जाणून घ्या
गर्भवती होऊ इच्छिता? तुमचे सर्वोत्तम प्रजनन दिवस जाणून घेऊ इच्छिता? तुमचा ओव्हुलेशन / स्त्रीबिजांचा कालावधी, लक्षणे आणि गर्भधारणेसाठीचे सर्वोत्तम दिवस जाणून घेण्यासाठी हे ओव्हुलेशन गणक / कॅल्क्युलेटर वापरा.
प्रश्न?
डॉक्टरांना विचारा
प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूती डॉक्टरांना विचारा आणि उत्तरे मिळवा.
अपॉइंटमेंट
स्त्रीरोगतज्ञासह भेट बुक करा
डॉ. वर्षाली माळी या अनुभवी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आहेत. तिच्यासोबत भेटीची वेळ बुक करा आणि सर्वोत्तम सल्ला, काळजी आणि उपाय मिळवा.