गर्भनिरोध गोळ्या की कंडोम? आययूडी किंवा रोपण? तुमच्यासाठी कोणत्या गर्भनिरोध पद्धती योग्य आहेत? कोणती पद्धत वापरायची याची खात्री नाही? तुम्हाला आवश्यक असलेली माहिती मिळवा आणि तुमच्यासाठी योग्य असलेली गर्भनिरोध पद्धत निवडा.
नैसर्गिक कुटुंब नियोजन म्हणजे अशी गर्भनिरोधक पद्धत ज्यामध्ये शरीर, त्याची लय, त्याचे चक्र समजून घेऊन गर्भधारणा टाळली जाते. उदाहरणार्थ, प्रजनन जागरुकता पद्धतीमध्ये आपल्या मासिक पाळीचा मागोवा घेतला जातो. या नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धती कोणत्या आहेत? आणि या पद्धतींचा वापर करून प्रभावीपणे गर्भधारणा कशी टाळायची? हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
गर्भधारणा टाळण्यासाठी त्वरित उपलब्ध होणाऱ्या, सोयीस्कर आणि सोप्या पद्धतीच्या शोधात आहात का?
प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धतीमध्ये शुक्राणू आणि स्त्रीबीज यांचे मिलन होऊ नये यासाठी कृत्रिम अडथळा निर्माण केला जातो. या सर्व गर्भनिरोधक पद्धतींमध्ये पुरुषांसासाठी असलेले कंडोम सर्वाधिक प्रमाणात वापरले जातात. परंतु, याचबरोबर इतर काही प्रकार, पर्यायदेखील या पद्धतीमध्ये उपलब्ध आहेत. जसे की, शुक्राणू किंवा वीर्यनाशक (स्पर्मीसाइड), विभाजन करणारा पडदा (डायाफ्राम), स्त्रियांसाठीचे कंडोम आणि यांसारखे प्रकार या पद्धतीत वापरले जातात. या पद्धती कोणत्या आहेत, या पद्धतींच्या मर्यादा आणि गर्भधारणा टाळण्यासाठी या गर्भनिरोधक पद्धतींचा वापर कसा करावा याविषयी माहिती लेखात देण्यात आली आहे.
मासिक पाळी चक्रादरम्यान संप्रेरकांचे नियमन करणे हे संप्रेरक गर्भनिरोधक पद्धतीचे मुख्य कार्य असते. ही पद्धत संप्रेरकांमधील पातळीनुसार होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवून कार्य करते. जगभरातील जवळपास १८ टक्के स्रिया गर्भधारणा टाळण्यासाठी संप्रेरक गर्भनिरोधक पद्धतीवर अवलंबून असतात. यामध्ये गर्भनिरोधक गोळ्या सर्वाधिक प्रमाणात वापरली जाणारी पद्धत आहे. या सर्व पद्धतींबाबतची माहिती पुढील लेखात जाणून घ्या आणि वेळापत्रकाच्या आधारे प्रभावीपणे गर्भधारणा कशी टाळता येईल याचीदेखील माहिती मिळवा.
गर्भनिरोधक घेण्याचे लक्षात राहात नाही का? गर्भधारणा टाळण्यासाठी दीर्घकालीन उपायाच्या शोधात आहात का?
एलएआरसी गर्भनिरोधक पद्धती चिंतामुक्त ठेवणारी पद्धती आहे. या पद्धतीचा एकदा वापर केल्यानंतर तुम्हाला त्याकडे वारंवार लक्ष द्यावे लागत नाही. गर्भधारणा टाळण्यासाठी अधिक विचार यामध्ये करावा लागत नाही. ना कुठले वेळापत्रक, ना कसला मागोवा, लैंगिक संबंधांमध्येही कसलीच चिंता न ठेवता त्याचा आनंद या पद्धतीमुळे घेता येतो. अंतर्गर्भीय उपकरण (इन्ट्रायुटेरिन डिव्हाइस/आययूडी) किंवा कॉपर टी या यामधील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या पद्धती आहेत. मात्र, अजूनही सोयीस्कर आणि वापरण्यास उपयुक्त अशा गर्भनिरोधक पद्धती आहेत. या सर्व पद्धती, त्यांची वैद्यकीय प्रक्रिया, सुरक्षेचा मुद्दा यांची माहिती मिळवा.
गर्भनिरोधक पद्धती आणि अनियोजित गर्भधारणेबद्दल अजिबात काळजी करण्याची इच्छा नाही?
भविष्यात कधीही गर्भधारणा होऊ नये यासाठी नसबंदी ही कायमस्वरुपी गर्भनिरोधक पद्धती वापरली जाते. पुरुष नसबंदी आणि स्री नसबंदी प्रक्रिया अंडवाहक नलिका बंद करते. ही प्रक्रिया ९९ टक्क्यांहून अधिक प्रभावी असते. नसबंदी केल्यानंतर ती पुन्हा खोलणे कठीण असते आणि गर्भधारणा टाळण्यासाठी ही प्रक्रिया म्हणजे कायमचा उपाय असते. त्यामुळे हा मोठा निर्णय घेताना चहुबाजूंनी विचार करणे आवश्यक असते. या लेखामध्ये नसबंदी प्रक्रिया, ती कशी केली जाते आणि ती करताना कोणते मुद्दे विचारात घ्यावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.
डॉ. वर्षाली माळी या अनुभवी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आहेत. तिच्यासोबत भेटीची वेळ बुक करा आणि सर्वोत्तम सल्ला, काळजी आणि उपाय मिळवा.
Language / भाषा
Dr. Varshali's Gynecology website is available in English languages. To read and interact in English, click "English" button.
डॉ. वर्षालीच्या स्त्रीरोग चिकित्सालयाची वेबसाइट मराठी भाषेत उपलब्ध आहे. मराठीत वाचण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी, "मराठी" बटणावर क्लिक करा.
अपॉइंटमेंट बुक करा
डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे का? लाइफ रिपब्लिक, हिंजवडी, पुणे येथे असलेल्या डॉ. वर्षालीच्या स्त्रीरोग चिकित्सालयामध्ये डॉ. वर्षाली माळी यांच्यासोबत भेटीची वेळ बुक करा. तिला तुम्हाला आणखी मदत करण्यात आनंद होईल.
डॉ. वर्षाली माळी
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर
नवीन आरोग्य सूचना मिळवा
डॉ. वर्षाली माळी या स्त्रीरोग, प्रसूती, मुलींचे प्रौढत्व आणि महिलांचे आरोग्य विषयांवर लिहितात. आम्ही आमच्या रूग्ण आणि समुदायामध्ये आरोग्य विषयक जागरूकता पसरवण्यासाठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरतो.
अपडेट राहण्यासाठी आणि डॉ. वर्षाली माळी यांच्याकडून शिक्षण, आरोग्य सूचना इत्यादी मिळवण्यासाठी खालील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आम्हाला फॉलो करा.