डॉ. वर्षाली माळी, एमबीबीएस, डीएनबी - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ.

प्रश्न आहे का?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभव प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञांना विचारा आणि त्वरित उत्तर मिळवा.
प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ यांना संदेश पाठवा - डॉ. वर्षाली माळी
प्रसूती चाचणी, आरोग्य सल्ला इत्यादींवरील लेख आणि बरेच काही.

लेख

प्रसूती व गरोदरपण

चाचण्या, तपासणीचे वेळापत्रक, काळजी, आरोग्य माहिती आणि बरेच काही.

प्रसूती चाचणी, आरोग्य सल्ला इत्यादींवरील लेख आणि बरेच काही.

गर्भधारणा गणक / कैलक्युलेटर

गर्भधारणेच्या महत्त्वाच्या तारखांचा अचूक अंदाज लावा

कॅलेंडर आयकॉन - गर्भधारणेची अंतिम तारीख कॅल्क्युलेटर - डॉ. वर्षाली माळी - स्त्रीरोगतज्ज्ञ

अचूक प्रसव तिथि अथवा बाळाच्या आगमनाची तारीख जाणून घ्या

बाळाच्या आगमनाची अपेक्षा करत आहात आणि बाळंतपणाची तारीख जाणून घ्यायची आहे? आठवड्यानुसार, महिन्यानुसार आणि गर्भधारणेच्या प्रगती स्थितीनुसार, या कॅल्क्युलेटर / गणक चा वापर करून अचूक प्रसव तिथि जाणून घ्या.
ओव्हुलेशन कालावधी आयकॉन - डॉ. वर्षाली माळी - स्त्रीरोग तज्ञ

गर्भवती होण्यासाठी सर्वोत्तम प्रजनन दिवस जाणून घ्या

गर्भवती होऊ इच्छिता? तुमचे सर्वोत्तम प्रजनन दिवस जाणून घेऊ इच्छिता? तुमचा ओव्हुलेशन / स्त्रीबिजांचा कालावधी, लक्षणे आणि गर्भधारणेसाठीचे सर्वोत्तम दिवस जाणून घेण्यासाठी हे ओव्हुलेशन गणक / कॅल्क्युलेटर वापरा.
गर्भवती महिलांसाठी लस - टीटी (धनुर्वात) इंजेक्शन आणि गरोदरपणातील इतर लसीकरण

गर्भवती महिलांसाठी लस

कोणती | कधी | संरक्षण

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर

गर्भधारणेमुळे स्त्रियांच्या शरीरात आणि प्रतिकारशक्तीत अनेक बदल होत असतात. शरीरात होणाऱ्या या बदलांमुळे बऱ्याचदा आई आणि शिशू या दोघांनाही संसर्गजन्य आजार होण्याची भिती असते. हे बदल गर्भ, गर्भाशय आणि नवजात शिशूवर विपरित परिणाम करणारे ठरतात. त्यामुळेच या आजारांपासून संरक्षण मिळविण्यासाठी गर्भवती महिलांचे लसीकरण महत्त्वाचे आहे. या लशी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करून गर्भवती महिला आणि गर्भात वाढणारे शिशू या दोघांचाही संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यात मदत करतात. गरोदरपणातील हे लसीकरण आईची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच शिशूच्या शरीरात प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) निर्माण करून शिशूचे संरक्षण करते. या लेखात आपण टीडॅप (टिटॅनस, डिप्थेरिया अँड पर्टुसिस) लस, टीटी (धनुर्वात) इंजेक्शन, टिटॅनस टॉक्झॉइड लस आणि इन्फ्लुएंझा लस यांचे फायदे, गरज आणि त्या घेण्याचा योग्य काळ याविषयी माहिती घेणार आहोत.
गर्भवती महिलांसाठी लस - टीटी (धनुर्वात) इंजेक्शन आणि गरोदरपणातील इतर लसीकरण
गर्भधारणेची अथवा गरोदर असल्याची लक्षणे - गर्भधारणा झाली हे कसे ओळखावे गर्भधारणेची अथवा गरोदर असल्याची लक्षणे - गर्भधारणा झाली हे कसे ओळखावे

गर्भधारणा झाली हे कसे ओळखावे

वस्तुस्थिती | अनुभव | सल्ला | पुढे काय ?

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर

आपण गर्भवती आहोत असा विचार येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. मासिक पाळी चुकणे किंवा लांबणे, गर्भनिरोधक गोळ्या घ्यायला विसरणे, आपल्या शरीरात नेहमीपेक्षा बदल झालेला जाणवणे, या आणि अशा अनेक गोष्टी गर्भवती असण्याच्या लक्षणांमध्ये येतात. गर्भधारणा झाल्याचे पहिले लक्षण प्रत्येक स्रीमध्ये वेगवेगळे असू शकते. पण गर्भधारणेची सामान्य लक्षणे प्रत्येकाला माहीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही जर बाळाचा विचार करीत असाल तर हा लेख तुम्हाला मार्गदर्शक ठरणारा आहे. या लेखात गर्भधारणेच्या प्रारंभिक लक्षणांविषयी माहिती मिळेल. तसेच गर्भधारणा झाल्यानंतर स्वतःची काळजी कशी घ्यावी यासाठी उत्तम मार्गदर्शन आणि उपायदेखील देण्यात आला आहेत. यामुळे गर्भधारणेतील काही त्रासदायक लक्षणांपासून तुम्हाला आराम मिळण्याबरोबरच या विषयातील सर्व प्रश्नांची उत्तरेही मिळण्यास मदत होईल.
निरोगी बाळ व सशक्त आईसाठी गरोदरपणात, बाळंतपणाच्या सुरुवातीला घ्यावयाची काळजी

निरोगी बाळ आणि सशक्त आई होण्यासाठी

स्व-शिक्षण | प्रेरणा | आधार | टिप्स

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर

तुमची गर्भधारणा चाचणी पॉझिटिव्ह आली आहे का? आपले बाळ हुशार आणि निरोगी असावे यासाठी प्रयत्नशील आहात का? यासाठी गर्भधारणेचा प्रारंभिक काळ महत्त्वपूर्ण आहे. कारण या काळात गर्भशिशूच्या आरोग्याचा पाया रचला जात असतो. एका लहानशा पेशीपासून आपला गर्भ तयार होत असतो आणि हळूहळू त्याची वाढ होत जाते. त्यामुळेच या छोट्याशा जीवाबाबत पहिल्या दिवसापासून सतर्क राहा. आपल्या बाळाच्या जीवनातील हा अमूल्य वेळ गमावू नका. गर्भधारणेच्या प्रारंभिक काळातील हे उपाय आनंदी कुटुंबासोबतच आनंदी बाळ आणि आई या सर्वांसाठीच उपयुक्त ठरणाऱ्या आहेत.
निरोगी बाळ व सशक्त आईसाठी गरोदरपणात, बाळंतपणाच्या सुरुवातीला घ्यावयाची काळजी
गरोदरपणातील चाचण्या, अल्ट्रासाऊंड, रक्त तपासणी माहिती व वेळापत्रक गरोदरपणातील चाचण्या, अल्ट्रासाऊंड, रक्त तपासणी माहिती व वेळापत्रक

कोणत्या | कधी | का ?

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर

आपण गर्भवती आहोत हे समजल्यापासून ते बाळ जन्माला येईपर्यंतचा प्रवास खूप रोमांचक असतो आणि यातील वेगवेगळे टप्पे तुम्हाला अनेक अनुभव देऊन जातात. निरोगी आणि आनंददायी गर्भावस्थेसाठी प्रसुतिपूर्व तपासणी आणि चाचणी वेळापत्रकाचे पालन करणे गरजेचे आहे. गर्भशिशूची आरोग्य तपासणी करण्यासाठी आपल्याला अनेक गर्भधारणा अल्ट्रासाउंड स्कॅन करावे लागतात हे बेबी अल्ट्रासाउंड स्कॅन गर्भशिशूच्या वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि गर्भशिशूची वाढ कशी होत आहे हे समजण्यासाठी मदत करतात. गर्भावस्था तपासणीच्या वेळा, त्यांच्यामधील अंतर, गर्भधारणा तपासणीचे प्रकार आणि अल्ट्रासाउंड स्कॅन आणि त्याचे वेळापत्रक याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
संपूर्ण गर्भधारणा / गरोदरपण चाचणी मार्गदर्शक | कोणती, कशी वापरायची व अचूकता

कोणती | कशी वापरायची | अचूकता

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर

जर, तुम्ही असुरक्षित संभोग केला असेल, तुमची मासिक पाळीदेखील आलेली नसेल आणि अनेक शारीरिक बदल जाणवू लागले असतील तर तुम्ही गर्भधारणेच्या प्रारंभिक लक्षणांचा अनुभव घेत आहात हे लक्षात येते. अशावेळी तुमच्या मनात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे ‘मी गर्भवती आहे का?’ आणि हा प्रश्न चिंता, कुतुहल, उत्साह तर कधीकधी तणावदेखील सोबत घेऊन येतो. या प्रश्नाचे उत्तर लवकरात लवकर मिळवण्यासाठी गर्भधारणा चाचणी हा उत्तम उपाय ठरतो. तसेच आम्ही देत असलेले संपूर्ण गर्भधारणा चाचणी मार्गदर्शक घरगुती गर्भधारणा चाचणी, वैद्यकीय मूत्र गर्भधारणा चाचणी, रक्त गर्भधारणा चाचणी आणि अल्ट्रासोनोग्राफी गर्भधारणा चाचणी यासह सर्व गर्भधारणा चाचण्यांबद्दल तपशील देते. गर्भधारणा झाली आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी कोणती चाचणी करावी, तिचा वापर कसा करावा, चाचणी कधी करावी आणि निकालाची अचूकता कशी तपासावी याविषयी तथ्ये यातून जाणून घेता येतील. तसेच आपल्या गर्भधारणा चाचणीचे निकाल सकारात्मक किंवा नकारात्मक असल्यास पुढे काय करावे या विषयी जाणून घ्या.
संपूर्ण गर्भधारणा / गरोदरपण चाचणी मार्गदर्शक | कोणती, कशी वापरायची व अचूकता

प्रश्न?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूती डॉक्टरांना विचारा आणि उत्तरे मिळवा.

अपॉइंटमेंट

डॉ. वर्षाली माळी या अनुभवी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आहेत. तिच्यासोबत भेटीची वेळ बुक करा आणि सर्वोत्तम सल्ला, काळजी आणि उपाय मिळवा.
भाषा बदला. - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय