डॉ. वर्षाली माळी, एमबीबीएस, डीएनबी - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ.

प्रश्न आहे का?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभव प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञांना विचारा आणि त्वरित उत्तर मिळवा.
प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ यांना संदेश पाठवा - डॉ. वर्षाली माळी
अल्ट्रासाऊंड किंवा सोनोग्राफी स्कॅन चाचणीद्वारे गर्भधारणा / गरोदरपणा ओळखणे

अल्ट्रासाऊंड किंवा सोनोग्राफी स्कॅन चाचणी

काय आहे | कशी कार्य करते | का वापरायची

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर

एमबीबीएस, डीएनबी (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र)

डिप्लोमा इन स्त्रीरोग एन्डोस्कोपी - जर्मनी

अल्ट्रासाऊंड किंवा सोनोग्राफी स्कॅन चाचणीद्वारे गर्भधारणा / गरोदरपणा ओळखणे

गर्भधारणा अल्ट्रासाउंड / सोनोग्राफी स्कॅन चाचणी म्हणजे काय?

ही एक वैद्यकीय निदान प्रक्रिया आहे जी स्क्रीनवर प्रतिमा तयार करण्यासाठी ध्वनी लहरींचा वापर करते, ज्यामुळे शरीरांतर्गत रचना पाहायला मिळतात. अल्ट्रासोनोग्राफी किंवा अल्ट्रासाउंड ही एक सुरक्षित वैद्यकीय निदान प्रक्रिया आहे. जिथे ट्रान्सड्युसरचा वापर करून शरीरात ध्वनीलहरी सोडल्या जातात. या ध्वनीलहरी शरीरातील हाडे आणि उतींमधून प्रतिबिंबित होतात आणि मॉनिटरवर काळी-पांढरी प्रतिमा तयार करतात. ही प्रक्रिया सुरक्षित आहे कारण ती एक्स-रे किंवा कॅट स्कॅनसारख्या किरणोत्सर्गाचा वापर करीत नाहीत.

अल्ट्रासोनोग्राफी किंवा अल्ट्रासाउंड प्रक्रिया काम कसे करते?

ट्रान्सड्युसरद्वारे १ ते १० दशलक्ष हर्टझच्या ध्वनी लहरी तयार करून व त्याचा वापर करुन अल्ट्रासाउंड प्रतिमा तयार केली जाते. ह्या ध्वनी लहरी जेंव्हा शरीराच्या वेळवेगळ्या भागातून जातात, तेंव्हा वेळवेगळ्या पद्धतीने प्रतिमा तयार करतात. उदाहरणार्थ, ध्वनी लहरी पोकळ किंवा द्रव भरलेल्या भागातून जातात, जसे की मुत्राशय आणि रक्तवाहिन्या, हे भाग स्क्रीनवर काळ्या रंगाचे दिसतात. उतींनी भरलेले क्षेत्र मधून जेंव्हा ह्या ध्वनी लहरी जातात तेंव्हा त्या राखाडी-पांढरी प्रतिमा तयार करतात. ज्यावेळी ह्या ध्वनिलहरी खूप कठीण भाग जसे कि हाडे याच्यातून जातात तेंव्हा त्या एक पांढरी चमकदार प्रतिमा तयार करतात. अश्या प्रकारे एक पूर्ण अल्ट्रासाउंड प्रतिमा तयार केली जाते कि जे गर्भधारणा आहे कि नाही आणि ती कशी आहे याची कल्पना देते.

अल्ट्रासाउंड सोनोग्राफी का करावी?

गर्भधारणा निकाल शोधण्याची ही सर्वात अचूक पद्धत आहे. यामुळे गर्भावस्थेत गर्भाची प्रतिमा घेता येते. अम्निओटिक फ्ल्युइड यात काळा दिसतो, ज्यामुळे बाळाची हाडे आणि प्रतिमेमध्ये सफेद रंगाच्या दिसतात. अल्ट्रासाउंड पद्धतीचा वापर आपल्या शेवटच्या मासिक पाळीच्या सुमारे साडेचार आठवड्यांनंतर आपल्या गर्भाचे दृश्यीकरण करण्यासाठी केला जाऊ शकतो. हि चाचणी गर्भधारणेचे किती आठवडे पूर्ण झाले आहेत आणि आपले बाळ किती निरोगी आहे हे आपल्याला सांगू शकते की. शेवटच्या मासिक पाळीनंतर सात आठवड्यांपर्यंत आपण आपल्या बाळाच्या हृदयाचे ठोके चाचणीद्वारे एकू शकता.
गर्भधारणा झाली आहे की नाही हे शोधण्याची ही सर्वात अचूक पद्धत आहे. अल्ट्रासोनोग्राफी किंवा अल्ट्रासाउंड स्क्रीनवर प्रतिमा तयार करण्यासाठी आणि शरीराची अंतर्गत रचना पाहण्यात मदत करण्यासाठी ध्वनी लहरींचा वापर करते. ही एक सुरक्षित प्रक्रिया आहे आणि यामुळे बाळाला किंवा आईला कोणतेही नुकसान होत नाही. सामान्यपणे मासिक पाळीच्या साडेचार आठवड्यानंतर ही चाचणी केली जाते व गर्भधारणेचा कालावधी आणि बाळाचे आरोग्य कसे आहे सांगण्यास मदत करते.
या लेखाची प्रत डाउनलोड करा, ठेवा आणि शेअर करा.

सदस्य व्हा

आणि डॉ. वर्षाली माळी यांच्याकडून आरोग्यविषयक सूचना मिळवा.

तुमची सदस्यता जतन केली जाऊ शकली नाही. कृपया पुन्हा प्रयत्न करा.
तुम्ही डॉ. वर्षालीच्या स्त्रीरोग चिकित्सालयाच्या आरोग्य अपडेट्सचे यशस्वीपणे सदस्यत्व घेतले आहे.

गर्भधारणा गणक / कैलक्युलेटर

गर्भधारणेच्या महत्त्वाच्या तारखांचा अचूक अंदाज लावा

कॅलेंडर आयकॉन - गर्भधारणेची अंतिम तारीख कॅल्क्युलेटर - डॉ. वर्षाली माळी - स्त्रीरोगतज्ज्ञ

अचूक प्रसव तिथि अथवा बाळाच्या आगमनाची तारीख जाणून घ्या

बाळाच्या आगमनाची अपेक्षा करत आहात आणि बाळंतपणाची तारीख जाणून घ्यायची आहे? आठवड्यानुसार, महिन्यानुसार आणि गर्भधारणेच्या प्रगती स्थितीनुसार, या कॅल्क्युलेटर / गणक चा वापर करून अचूक प्रसव तिथि जाणून घ्या.
ओव्हुलेशन कालावधी आयकॉन - डॉ. वर्षाली माळी - स्त्रीरोग तज्ञ

गर्भवती होण्यासाठी सर्वोत्तम प्रजनन दिवस जाणून घ्या

गर्भवती होऊ इच्छिता? तुमचे सर्वोत्तम प्रजनन दिवस जाणून घेऊ इच्छिता? तुमचा ओव्हुलेशन / स्त्रीबिजांचा कालावधी, लक्षणे आणि गर्भधारणेसाठीचे सर्वोत्तम दिवस जाणून घेण्यासाठी हे ओव्हुलेशन गणक / कॅल्क्युलेटर वापरा.

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ

डॉ. वर्षाली माळी या प्रसुती शास्त्र आणि स्त्रीरोग शास्त्रात प्रवीण असून या क्षेत्रात कार्यरत आहेत. पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर डीएनबी (प्रसुतिशास्त्र व स्त्रीरोग शास्त्र) यामध्ये जिहांगीर हॉस्पिटल पुणे येथून पद्व्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच युनिवर्सिटी ऑफ श्लेस्विग होलस्टाइन, जर्मनी येथून गायनेकॉलॉजीकल एन्डोस्कोपी या विषयात डिप्लोमा पूर्ण केला आहे. प्रसुती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून त्यांना अनेक वर्षांचा गाढा अनुभव आहे. तसेच या विषयात त्या व्याख्याता म्हणूनदेखील मार्गदर्शन करतात. पुण्यातील मारुंजी येथील लाइफ रिपब्लिक टाउनशिपमध्ये त्यांचे चिकित्सालय असून हिंजवडी, वाकड आणि उपनगरांतील स्त्रियांना त्या वैद्यकीय सेवा देतात. हसतमुख आणि आश्वासक स्वभाव, प्रसुती आणि स्त्रीरोगांविषयी सखोल ज्ञान यामुळे स्त्रियांना त्यांचे मार्गदर्शन फायदेशीर आणि मदत करणारे ठरते आहे. डॉ. वर्षाली या दोन मुलींच्या आई असून मातृत्व ही सर्वांगसुंदर भेट असल्याचे त्या मानतात. आपले ज्ञान आणि शिक्षणाचा स्त्रियांना फायदा व्हावा यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.

प्रश्न?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूती डॉक्टरांना विचारा आणि उत्तरे मिळवा.

अपॉइंटमेंट

डॉ. वर्षाली माळी या अनुभवी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आहेत. तिच्यासोबत भेटीची वेळ बुक करा आणि सर्वोत्तम सल्ला, काळजी आणि उपाय मिळवा.
भाषा बदला. - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय