डॉ. वर्षाली माळी, एमबीबीएस, डीएनबी - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ.

प्रश्न आहे का?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभव प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञांना विचारा आणि त्वरित उत्तर मिळवा.
प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ यांना संदेश पाठवा - डॉ. वर्षाली माळी
गर्भधारणा / गरोदरपणा चाचणीचे सकारात्मक परिणाम मिळाल्यानंतर पुढे काय करायचे ?

गर्भधारणा / गरोदरपणा चाचणीचे सकारात्मक परिणाम मिळाल्यानंतर पुढे काय करायचे ?

पर्याय | क्रिया | खोटे सकारात्मक परिणाम

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर

एमबीबीएस, डीएनबी (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र)

डिप्लोमा इन स्त्रीरोग एन्डोस्कोपी - जर्मनी

गर्भधारणा / गरोदरपणा चाचणीचे सकारात्मक परिणाम मिळाल्यानंतर पुढे काय करायचे ?
तुमची गर्भधारणा चाचणी सकारात्मक आली आहे आणि तुम्ही गर्भवती आहात. अश्यावेळी, आता पुढे काय हा प्रश्न पडतो. या गोष्टीला दोन बाजू आहेत. एक म्हणजे तुम्ही या गर्भधारणेची योजना आखली आहे आणि बाळाला जन्म द्यायचा आहे. दुसरी म्हणजे ही एक अनियोजित किंवा अनपेक्षित गर्भधारणा आहे.

तुम्हाला मुल हवे असेल तर...

गर्भधारणा झाल्यानंतर तुम्ही बाळाला जन्म देण्याचा विचार करीत असल्यास, आपण गर्भवती असल्याची खात्री करण्यासाठी आणखी एक किंवा दोन चाचण्या करा. तसेच या गर्भधारणा चाचणी निकालाबाबत काही संभ्रम झाल्यास आपल्या प्रसुति तज्ज्ञांना भेटा. गर्भधारणेच्या आठ आठवड्यांचा टप्पा गाठण्यापूर्वी प्रसुति किंवा स्रीरोग तज्ज्ञांना भेटण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर डॉक्टर गर्भधारणा आणि प्रसुति याबाबत पुढील योजना आखू शकतात तसेच तुम्हाला त्याविषयी सल्ला देतात. आपल्याला आवश्यक असलेली प्रसुतिपूर्व काळजी, पुढील नऊ महिने स्वतःला आणि गर्भशिशूला निरोगी ठेवण्यासाठी आपल्या जीवनशैलीबद्दल, औषधोपचार आणि आहाराबद्दल मार्गदर्शक तत्वे देऊ शकतात.

अनपेक्षित गर्भधारणा झाली असल्यास...

जर तुम्ही अनपेक्षितपणे गर्भवती झालात आणि गर्भधारणा होण्यासाठी काही योजना आखली नसेल तर, आता पुढे काय करावे हा विचार गोंधळात टाकणारा ठरेल. अशा परिस्थितीत आपला जोडीदार तसेच जवळच्या लोकांशी बोला. मदत व मार्गदर्शनासाठी गर्भधारणेच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. पहिला पर्याय म्हणजे बाळाला जन्म देण्याबाबत सकारात्मक विचार करा. मुळात आपण मुल होण्याबद्दल काही योजना आखली नसली तरीही गर्भधारणा सकारात्मकपणे घेऊन बाळाला जन्म देण्याविषयी विचार करू शकता. आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत चर्चा करून या सर्व पर्यायांचा आढावा घ्या. तरीही काही अपरिहार्य कारण किंवा अडचण असल्यास बाळ होऊ देण्याचा विचार नसेल तर गर्भधारणा संपविण्याच्या पर्यायांसाठी प्रसुति किंवा स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अनियोजित गर्भधारणा टाळण्यासाठी भविष्यात गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

अनपेक्षित गर्भधारणा झाली असल्यास...

काहीवेळा घरगुती गर्भधारणा चाचणी सकारात्मक येऊ शकते, परंतु प्रत्यक्षात तुम्ही गर्भवती नसतात. जर आपण चाचणी संच कालबाह्य झाल्यानंतर वापरला असेल किंवा वंध्यत्व उपचारादरम्यान एचसीजी इंजेक्शन दिले असेल तर सहसा हा प्रसंग घडू शकतो. तसेच काहींना कर्करोग किंवा इतर वैद्यकीय परिस्थितींमध्ये चुकीचा सकारात्मक गर्भधारणा चाचणी परिणामदेखील दिसू शकतो. ज्यामुळे एचसीजी पातळी उच्च होऊ शकते.
गर्भधारणेच्या परिणामांची खात्री करण्यासाठी आणि पुढील निर्णय घेण्यासाठी स्रीरोग किंवा प्रसुति तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची शिफारस केली जाते. भविष्यातील परिणाम आणि अस्वस्थ वातावरणाचा विचार करता गर्भधारणा चाचणी सकारात्मक आल्यानंतर त्वरित गर्भवती असल्याचे घोषित करू नका. काही आठवड्यांपर्यंत आपल्या भावनांना आवर घाला. शांत राहा आणि मग आपल्या स्रीरोग तज्ज्ञांचे याविषयी मार्गदर्शन घ्या. तुमच्या गर्भधारणा स्थितीवरून ते तुम्हाला गर्भधारणा घोषित कधी करावी याविषयी मार्गदर्शन करतील.
गर्भधारणा चाचणी सकारात्मक आल्यानंतर आपल्याला बाळ होऊ द्यायचे आहे की नाही या निर्णयावर पुढील कृती अवबंलून असतात. दोन्ही परिस्थितीमधील वेगवेगळे पर्याय जाणून घेण्यासाठी प्रसुति किंवा स्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. मुल व्हावे अशी इच्छा असेल तर, आठ आठवड्यांच्या गर्भधारणेची खूण गाठण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर, आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य चांगले राखण्याविषयी योग्य मार्गदर्शन करतील. त्यामुळे गर्भधारणा चाचणीतील निकालांबाबत जागरूक राहा आणि आपण गर्भवती आहोत हे जाहीर करण्यापूर्वी खात्री म्हणून डॉक्टरांचा सल्ला घ्या..
या लेखाची प्रत डाउनलोड करा, ठेवा आणि शेअर करा.

सदस्य व्हा

आणि डॉ. वर्षाली माळी यांच्याकडून आरोग्यविषयक सूचना मिळवा.

तुमची सदस्यता जतन केली जाऊ शकली नाही. कृपया पुन्हा प्रयत्न करा.
तुम्ही डॉ. वर्षालीच्या स्त्रीरोग चिकित्सालयाच्या आरोग्य अपडेट्सचे यशस्वीपणे सदस्यत्व घेतले आहे.

गर्भधारणा गणक / कैलक्युलेटर

गर्भधारणेच्या महत्त्वाच्या तारखांचा अचूक अंदाज लावा

कॅलेंडर आयकॉन - गर्भधारणेची अंतिम तारीख कॅल्क्युलेटर - डॉ. वर्षाली माळी - स्त्रीरोगतज्ज्ञ

अचूक प्रसव तिथि अथवा बाळाच्या आगमनाची तारीख जाणून घ्या

बाळाच्या आगमनाची अपेक्षा करत आहात आणि बाळंतपणाची तारीख जाणून घ्यायची आहे? आठवड्यानुसार, महिन्यानुसार आणि गर्भधारणेच्या प्रगती स्थितीनुसार, या कॅल्क्युलेटर / गणक चा वापर करून अचूक प्रसव तिथि जाणून घ्या.
ओव्हुलेशन कालावधी आयकॉन - डॉ. वर्षाली माळी - स्त्रीरोग तज्ञ

गर्भवती होण्यासाठी सर्वोत्तम प्रजनन दिवस जाणून घ्या

गर्भवती होऊ इच्छिता? तुमचे सर्वोत्तम प्रजनन दिवस जाणून घेऊ इच्छिता? तुमचा ओव्हुलेशन / स्त्रीबिजांचा कालावधी, लक्षणे आणि गर्भधारणेसाठीचे सर्वोत्तम दिवस जाणून घेण्यासाठी हे ओव्हुलेशन गणक / कॅल्क्युलेटर वापरा.

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ

डॉ. वर्षाली माळी या प्रसुती शास्त्र आणि स्त्रीरोग शास्त्रात प्रवीण असून या क्षेत्रात कार्यरत आहेत. पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर डीएनबी (प्रसुतिशास्त्र व स्त्रीरोग शास्त्र) यामध्ये जिहांगीर हॉस्पिटल पुणे येथून पद्व्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच युनिवर्सिटी ऑफ श्लेस्विग होलस्टाइन, जर्मनी येथून गायनेकॉलॉजीकल एन्डोस्कोपी या विषयात डिप्लोमा पूर्ण केला आहे. प्रसुती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून त्यांना अनेक वर्षांचा गाढा अनुभव आहे. तसेच या विषयात त्या व्याख्याता म्हणूनदेखील मार्गदर्शन करतात. पुण्यातील मारुंजी येथील लाइफ रिपब्लिक टाउनशिपमध्ये त्यांचे चिकित्सालय असून हिंजवडी, वाकड आणि उपनगरांतील स्त्रियांना त्या वैद्यकीय सेवा देतात. हसतमुख आणि आश्वासक स्वभाव, प्रसुती आणि स्त्रीरोगांविषयी सखोल ज्ञान यामुळे स्त्रियांना त्यांचे मार्गदर्शन फायदेशीर आणि मदत करणारे ठरते आहे. डॉ. वर्षाली या दोन मुलींच्या आई असून मातृत्व ही सर्वांगसुंदर भेट असल्याचे त्या मानतात. आपले ज्ञान आणि शिक्षणाचा स्त्रियांना फायदा व्हावा यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.

प्रश्न?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूती डॉक्टरांना विचारा आणि उत्तरे मिळवा.

अपॉइंटमेंट

डॉ. वर्षाली माळी या अनुभवी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आहेत. तिच्यासोबत भेटीची वेळ बुक करा आणि सर्वोत्तम सल्ला, काळजी आणि उपाय मिळवा.
भाषा बदला. - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय