डॉ. वर्षाली माळी, एमबीबीएस, डीएनबी - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ.

प्रश्न आहे का?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभव प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञांना विचारा आणि त्वरित उत्तर मिळवा.
प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ यांना संदेश पाठवा - डॉ. वर्षाली माळी
गरोदरपणातील चाचण्या, बाळाचे अल्ट्रासाऊंड, रक्त तपासणी याची माहिती व वेळापत्रक
गरोदरपणातील चाचण्या, बाळाचे अल्ट्रासाऊंड, रक्त तपासणी याची माहिती व वेळापत्रक

माहिती व वेळापत्रक

गरोदरपणातील चाचण्या, बाळाचे अल्ट्रासाऊंड, रक्त तपासणी

कोणत्या | कधी | का ?

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर

एमबीबीएस, डीएनबी (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र)

डिप्लोमा इन स्त्रीरोग एन्डोस्कोपी - जर्मनी

गरोदरपणातील चाचण्या, बाळाचे अल्ट्रासाऊंड, रक्त तपासणी याची माहिती व वेळापत्रक
आपण गर्भवती आहोत हे कळल्यापासून ते बाळ जन्माला येईपर्यंतचा प्रवास रोमांचक असतो आणि त्यात बरेच टप्पेदेखील तुम्हाला पार करावे लागतात. या प्रवासातील नवीन दिनचर्येचा तुम्ही आनंद घेतात आणि हा संपूर्ण प्रवास खूप उत्साहाने भरलेला असतो. आपले बाळ जन्माला कधी येणार हे जाणून घेण्याचा उत्साह, आपल्या बाळाच्या हृदयाचे ठोके प्रथमच ऐकण्याची उत्सुकता, बाळ पोटात असताना हालचाल कसे करते आणि या हालचालीतून तुम्हाला आई अशी हाक मारण्याचा जेव्हा प्रयत्न करते ते क्षण विलक्षण असतात. अशा अनंत क्षणांनी तुमचा गर्भावस्था प्रवास रोमांचक होत असतो.
निरोगी आणि आनंददायी गर्भावस्थेसाठी प्रसुतिपूर्व तपासणी आणि इतर चाचणी वेळापत्रकाचे पालन करणे महत्त्वाचे आहे. गर्भशिशूची वाढ कशी होतेय याचा मागोवा घेण्यासाठी गर्भावस्था तपासणीच्या वेळा आणि वेळापत्रक यांचे नियमित पालन करा. गर्भशिशूची वाढ कशी होते आहे हे जाणून घेण्यासाठी अल्ट्रासाउंड सोनोग्राफीदेखील करावी लागेल. त्यामुळे अल्ट्रासाउंड सोनोग्राफीचे वेळापत्रकही नियमित पाळा. या लेखात गर्भधारणा तपासणी वेळापत्रक, गर्भधारणा तसापणीची वेळ, गर्भधारणा अल्ट्रासाउंड स्कॅनचा प्रकार आणि त्याबद्दलचे तपशील यांचा समावेश आहे.

गर्भावस्था तपासणी वेळापत्रक

आपले प्रसुति किंवा स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्यासोबत असलेले आपले नाते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आपले अनुभव त्यांच्यासोबत बोलून व्यक्त करणे, त्यांचा सल्ला विचारणे, आपल्या गर्भशिशूची वाढ कशी होत आहे याबद्दल जाणून घेणे, या संपूर्ण प्रश्नांची आणि घटनांची उत्तरे तुम्हाला त्यांच्याकडेच मिळतात. गर्भावस्था तपासणी, अल्ट्रासाउंड तपासणी यानिमित्ताने डॉक्टरांसोबत नेहमी संवाद होत असतो. हा संवाद मोकळा ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. तुमच्या मनात काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते या संवादातून स्पष्ट होऊ शकतात आणि यामुळे आपल्या गर्भशिशूची वाढ कशी होतेय हे जाणून घेण्यातही अडथळे येणार नाहीत. तपासणीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे.

४ ते २८ आठवडे | प्रसुतिपूर्व तपासणी महिन्यातून एकदा

२८ ते ३६ आठवडे | प्रसुतिपूर्व तपासणी दोन आठवड्यांतून एकदा

३६ ते ४० आठवडे | प्रसुतिपूर्व तपासणी आठवड्यातून एकदा

गर्भावस्था तपासणीसाठी हे साधारण वेळापत्रक आहे. परंतु, आपले आणि गर्भशिशूचे आरोग्य, त्याची वाढ कशी आहे यावरही हे वेळापत्रक अवलंबून आहे. तुमच्या डॉक्टरांनी दिलेले तपासणी वेळापत्रक नियमितपणे पाळा. त्यात खंड पडणार नाही याची काळजी घ्या. प्रसुतिपूर्वी आपली आणि गर्भशिशूची शक्य तितकी काळजी घेणे आवश्यक आहे. खरंतर जेव्हा एखादी आई प्रसुतिपूर्व काळात स्वतःची योग्य काळजी घेत नाही तेव्हा त्याचा परिणाम बाळाच्या वजनावर किंवा आरोग्यावर झालेला पाहायला मिळतो. थोड्याशा निष्काळजीपणामुळे बाळाचे वजन तीन पटीने कमी होण्याची शक्यता असते.
गर्भावस्थेतील हे जीवन कधीकधी व्यस्त वाटू शकते. परंतु, लक्षात ठेवा की आपल्या बाळाचे आरोग्य यावर अवबंलून आहे. जेव्हा बाळ आनंदी आणि सुदृढ जन्माला येईल तेव्हा तुम्ही हे सर्व कष्ट किंवा हा सर्व काळ विसरून केवळ बाळाच्या अवतीभोवती राहण्याचा प्रयत्न कराल. त्याचा सहवास तुम्हाला ऊर्जा देईल. त्यामुळेच गर्भावस्थेत नेहमी सकारात्मक आणि प्रेरित राहा. आपल्या दिलेल्या वेळापत्रक आणि वेळेचे पालन जरूर करा.
प्रसुतिपूर्व तपासणी आणि गर्भावस्थेदरम्यान आवश्यक अल्ट्रासाउंड स्कॅनसाठी आठवड्यांनुसार वेळापत्रक पुढीलप्रमाणे.

६ ते १० आठवडे

६ ते १० आठवडे - गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ - डॉ. वर्षाली माळी
६ ते १० आठवडे - गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ - डॉ. वर्षाली माळी
जेव्हा तुम्हाला गर्भधारणेबद्दल माहिती मिळते तेव्हा तुमची पहिली प्रसुतिपूर्व तपासणी भेट लवकर व्हायला हवी. तुमच्या पहिल्या प्रसुतिपूर्व किंवा गर्भावस्थेतील पहिल्या भेटीत तुमचा वैद्यकीय इतिहास नोंदविला जातो आणि सामान्य आरोग्य तपासणी केली जाते. यामध्ये तुमचे वजन, उंची, रक्तदाब आणि बॉडी इंडेक्स मास (म्हणजे तुमची उंची आणि वजनाचे गुणोत्तर) यांची नोंदणी केली जाते. यामध्ये हृदय किंवा श्वसनासंदर्भात असलेल्या कोणत्याही समस्या शोधण्यासाठी तपासणी केली जाते. निरोगी बाळ, गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळातील काळजी, आहार आणि गर्भावस्थेतील काळजी या सर्व गोष्टींचे पालन करण्याचा सल्ला डॉक्टर तुम्हाला देतात.
या काळात काही औषधेदेखील घ्यावी लागतात. जसे की, फॉलिक असिड हे महत्त्वपूर्ण व्हिटॅमिनचा स्रोत आहे. बाळामध्ये मज्जातंतू दोष टाळण्यासाठी आपल्या पहिल्या तिमाहीत म्हणजे गर्भावस्थेच्या पहिल्या तीन महिन्यात फॉलिक असिडचा पूरक आहार घेण्याची शिफारस केली जाते. या कालावधीत तुम्हाला मळमळ किंवा उलटी यांसारख्या गर्भधारणेच्या लक्षणांचा अनुभव येऊ शकतो. आवश्यक असल्यास यावरदेखील औषधे डॉक्टर देतात.
सहा ते नऊ आठवड्यांच्या काळात पहिले गर्भधारणा अल्ट्रासाउंड स्कॅन करण्याची शिफारस केली जाते. आपल्या गर्भधारणेची खात्री करण्यासाठी स्कॅनची आवश्यकता नसली तरीही, डेटिंग आणि व्हायाबिलिटी अल्ट्रासाउंड स्कॅन इतर अनेक बाबींमध्ये मदत करते. आपल्या बाळाची वाढ योग्यरित्या होते आहे की नाही हे यातून समजते. तसेच प्रसुतिची अचूक तारीखही ते शोधते. रक्तस्राव होत असल्यास त्याचे कारण शोधते आणि गर्भाशयात किती गर्भ आहे हेदेखील दर्शवते. आपल्या बाळाच्या हृदयाचे ठोके प्रथमच ऐकणे हा अल्ट्रासाउंड स्कॅनमधली सर्वाधिक रोमांचक अनुभव आहे.
या काळात तुम्हाला अनेकदा रक्त-लघवी चाचणी करावी लागते. या चाचण्यांमुळे हिमोग्लोबीन, रक्तगट, थायरॉइड फंक्शन, रक्तनलिकांची स्थिती ओळखता येते. आपल्याला काही संसर्ग झाला आहे का याचादेखील शोध या चाचण्यांमधून घेता येतो. जसे की, हिपॅटायटीस बी, एचआयव्ही, सिफलिस आणि थॅलेसेमिया याचा शोध घेतला जातो. तसेच रक्तातील साखरेची पातळी (साधारण साखरेची पातळी किंवा उपाशीपोटी साखरेची पातळी), मधुमेह यांची तपासणी केली जाऊ शकते. लघवीची चाचणी प्रथिन (प्रोटीन) चे अंश शोधण्यासाठी असते. प्रोटिनच्या या प्रमाणानुसार तुम्हाला काही संसर्ग झाला आहे का याची माहिती मिळते. जसे की, गर्भावस्थेतील अपस्माराचे लक्षण, असिम्प्टोमॅटिक बॅक्टेरिएया (एएसबी) नावाचा लघवीच्या जागी संसर्ग होणारा आजार यांची माहिती यामधून मिळते. जर असा काही संसर्ग झाला असेल तर, गर्भशिशूच्या आरोग्याला त्याचा घोका असतो त्यामुळेच ही चाचणीही महत्त्वाची असते.
एकंदरीत आनंदी आणि निरोगी गर्भावस्था प्रवास होण्यासाठी आपली पहिली प्रसुतिपूर्व चाचणी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात स्वतःकडे आणि गर्भशिशूकडे विशेष लक्ष द्या.

११ ते १३ आठवडे

११ ते १३ आठवडे - गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ - डॉ. वर्षाली माळी
११ ते १३ आठवडे - गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ - डॉ. वर्षाली माळी
गर्भावस्थेच्या ११ ते १३ आठवड्यांच्या दरम्यान, नियमित रक्तदाब तपासणी आणि वजन मोजले जाते. गर्भावस्थेत आईचे सुमारे ११ ते १६ किलो वजन वाढणे सामान्य बीएमआय (गर्भधारणा बीएमआय १८.५ ते २४.९) असलेल्या व्यक्तींसाठी चांगले मानले जाते. वजन वाढण्याचे प्रमाण बाळाच्या वाढीसाठीही मदत करते. या काळात लोह आणि कॅल्शिअमपूरक आहार सुरू केला जातो. ११ ते १३ आठवड्यांच्या तसापणी कालावधीत न्यूचल ट्रान्सलुसन्सी (एनटी) स्कॅन हा गर्भावस्था स्कॅन सर्वात महत्त्वाचा भाग असते. न्युचल ट्रान्सल्युसन्सी स्कॅन डाउन सिंड्रोमच्या जोखमीचे मूल्यांकन करण्यासाठी या द्रवपदार्थाचा घट्टपणा मोजतो.
हा स्कॅन आपल्या बाळाच्या मानेच्या मागच्या बाजूस असलेली त्वचेची घडी मोजतो. या घडीची वाढलेली जाडी गुणसूत्र विकृती दर्शवू शकते, परंतु यातून आपल्या बाळामध्ये काही गुणसूत्र दोष आहेत अथवा नाहीत हे सिद्ध होत नाही. सामान्य लोकांच्या तुलनेत आपल्या बाळाला गुणसूत्र विकृतीचा उच्च धोका किंवा कमी धोका आहे अथवा नाही हे या टेस्टमधून समजू शकते. एनटी स्कॅनचा मुख्य हेतू म्हणजे डाउन सिंड्रोमसारख्या गुणसूत्र विकृती तपासणे हा असतो. जर तुमच्या पहिल्या तपासणी भेटीदरम्यान डेटिंग स्कॅन केलेले नसल्यास गर्भावस्था अल्ट्रासाउंड स्कॅनचा उपयोग प्रसुतिची तारीख अचूकपणे मोजण्यासाठी होतो. तसेच आपल्या गर्भात एकापेक्षा अधिक गर्भशिशूंची वाढ होते आहे का हे समजण्यासाठीही होतो.

१६ वा आठवडा

१६ वा आठवडा - गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ - डॉ. वर्षाली माळी
१६ वा आठवडा - गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ - डॉ. वर्षाली माळी
गर्भावस्थेच्या सोळाव्या आठवड्याच्या तपासणीदरम्यान, आपला रक्तदाब आणि वजन तपासले जाते. बाळाची वाढ कशी आहे हे पाहण्यासाठी पोटाची तपासणी केली जाते. या आठवड्यापासून, आपण आपल्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू शकता. हा गर्भावस्थेतील सर्वात आश्चर्यकारक क्षण तुम्ही अनुभवू शकतात.
या काळात लोह आणि कॅल्शिअमपूरक आहार घेण्याचा सल्ला देण्यात येतो. गर्भावस्थेत नेहमीपेक्षा लोहाचे महत्त्व अधिक असते. लोह हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी मदत करते. जे लाल रक्तपेशींना शरीराभोवती ऑक्सिजन साठवण्यासाठी आणि वाहून नेण्यास मदत करते. आपल्याला आहारातून पुरेसे लोह न मिळाल्यास अशक्तपणा जाणवू शकतो. याला अनेमिया म्हणजेच लोह कमतरता अशक्तपणा असे म्हणतात.
गर्भावस्थेदरम्यान, आपल्या वाढत्या बाळासाठी आवश्यक असलेले रक्त तयार करण्यासाठी आपल्या शरीराला नेहमीपेक्षा अधिक लोहाची आवश्यकता असते. तसेच शरीरात द्रवदेखील अधिक असल्याने हिमोग्लोबिन पातळ होते. म्हणूनच गर्भावस्थेत पुरेसे लोह शरीराला मिळणे गरजेचे आहे. जेणेकरून आई आणि बाळ दोघेही सुखरूप राहतात. गर्भधारणेच्या सोळा आठवड्यानंतर आपल्या गर्भशिशूची वाढ आणि त्याच्या शरीरात होणारे बदल याविषयी पुरेशी माहिती तुम्हाला मिळणे आवश्यक असते. याविषयी तुम्हाला अजूनही काही प्रश्न असल्यास आपल्या डॉक्टरांची त्वरित भेट घ्यावी आणि या सर्व शंकांचे निरसन करून घ्यावे.

१८ ते २० आठवडे

१८ ते २० आठवडे - गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ - डॉ. वर्षाली माळी
१८ ते २० आठवडे - गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ - डॉ. वर्षाली माळी
नियमित तपासणीसाठी १८ ते २० आठवड्यांच्या गर्भावस्था तपासणी भेटी वेगळ्या स्वरुपाच्या नसतात. इतर भेटींप्रमाणेच, यात बाळाची वाढ समजून घेण्यासाठी आपला रक्तदाब आणि वजन तपासणे यांचा समावेश असतो. १८ ते २० आठवडे हा आपल्या गर्भावस्थेचा अर्धा टप्पा आहे. गर्भावस्थेच्या या टप्प्यात गर्भशिशूचे बहुतांश अवयव विकसित झालेले असतात आणि स्कॅनमध्ये स्पष्टपणे दिसू शकतात. तर, या कालावधीत एक महत्त्वपूर्ण गर्भधारणा अल्ट्रासाउंड स्कॅन ज्याला अनोमली किंवा अल्ट्रासाउंड लेव्हल २ स्कॅन म्हणतात. हे स्कॅन आपल्या बाळाची वाढ कशी होत आहे हे समजून घेण्यास, गर्भाच्या हालचाली तपासण्यास, बाळाच्या अंतर्गत अवयवांची वाढ पाहण्यास आणि आपल्या बाळामध्ये काही दोष किंवा त्याच्या वाढीत काही अडचण असल्यास ते शोधण्यात मदत करते. बाळाच्या अंतर्गत अवयवांचे पैलू तपासले जातात. ज्यात डोके, चेहरा, लांबी आणि पाठीचा कणा, पोट, हृदय, मूत्रपिंड, हात, पाय यांचा आकार आणि रचना यांचा समावेश आहे. आपल्या बाळाची वाढ कशी होत आहे हे तपशीलवार पाहण्यासाठी डॉक्टर प्लेसेंटा, नाळ आणि अम्निओटिक फ्लुइडची तपासणी करू शकतात.
या काळात अनोमली स्कॅन महत्त्वाचे आहे कारण जर एखादी समस्या आढळली तर आवश्यक ती खबरदारी घेतली जाऊ शकते. या स्कॅनमुळे पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण होऊ शकते. अशावेळी हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, बऱ्याच सुदृढ असलेल्या बाळांमध्येही काही लक्षणे आढळून येऊ शकतात. त्यामुळे काही असामान्य आढळल्यास घाबरून जाऊ नका. डॉक्टरांशी चर्चा करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. आवश्यक असल्यास पुन्हा स्कॅन करा. यामुळे तुमची समस्या सोडविण्यास मदत होते.

२४ ते २६ आठवडे

२४ ते २६ आठवडे - गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ - डॉ. वर्षाली माळी
२४ ते २६ आठवडे - गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ - डॉ. वर्षाली माळी
नेहमीप्रमाणे, २४ ते २६ आठवड्यांच्या तपासणी भेटींमध्ये रक्तदाब, वजन आणि बाळाची वाढ योग्य होते आहे की नाही याची खात्री करण्यासाठी ओटीपोट तपासणीचा यात समावेश असतो. आपल्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकण्याचा पुन्हा एकदा तुम्हाला अनुभव मिळतो. हिमोग्लोबिनची पातळी तपासण्यासाठी पुन्हा एकदा रक्त तपासणी केली जाते. या तपासणी अहवालातून तुमच्या लोहपुरक आहार किंवा औषधांमध्ये बदल करण्यात येतो. आवश्यक असल्यास दुसऱ्या पूरक लोह आहाराचा सल्ला दिला जाऊ शकतो.
गर्भावस्था मधुमेह चाचणी करण्यासाठी ग्लुकोज चाचणी करण्यास सांगितले जाऊ शकते. गर्भावस्थेतत जेव्हा आपल्या रक्तात जास्त प्रमाणात साखर असते तेव्हा गर्भावस्था मधुमेह होतो. जेव्हा आपले शरीर इन्शुलिन नावाच्या ग्रंथीसत्व (हार्मोन) चे पुरेसे उत्पादन करत नाही तेव्हा आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. इन्शुलिन आपल्या स्नायू आणि उतींना (टिश्यू) उर्जा मिळावी यासाठी साखर वापरण्यास मदत करते आणि आपल्या शरीरास आवश्यक नसलेली कोणतीही रक्तातील साखर साठविण्यास मदत करते. आपल्या रक्तात जास्त प्रमाणात साखर असणे आई आणि बाळासाठी समस्या उद्भवू शकते, म्हणून गर्भावस्थेत अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. ग्लूकोज चॅलेंज चाचणी साखरेच्या समस्येला ओळखण्यास मदत करतेच पण यासोबतच आई आणि बाळासाठी कोणतीही समस्या टाळण्यासाठी आवश्यक कृती करण्यास मदत करते.
‘फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया’ (एफओजीएसआय) ने गर्भावस्थेच्या २६ आठवड्यांपासून सर्व गर्भवती महिलांसाठी शीतज्वर (फ्लू) लसीकरण करण्याची शिफारस केली आहे. फ्लूची लस घेतल्यास स्वाइन फ्लू आणि फ्लूच्या इतर प्रकारांपासून आई आणि बाळाचे संरक्षण होण्यास मदत होते. जर फ्लुचा उद्रेक झाला असेल तर तुम्हाला आधी लस घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. गर्भधारणेमुळे स्त्रीच्या शरीरात रोगप्रतिकारशक्तीत बदल होतात. ज्यामुळे संसर्गजन्य रोगांना बळी पडण्याची शक्यता वाढते. यासाठी गर्भावस्था लसीकरणाचा लेख वाचा, लसीकरणाचे वेळापत्रक आणि त्यातून होणारे संरक्षण याबद्दल अधिक जाणून घ्या.

२८ वा आठवडा

२८ वा आठवडा - गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ - डॉ. वर्षाली माळी
२८ वा आठवडा - गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ - डॉ. वर्षाली माळी
या आठवड्यात गर्भावस्था तपासणी भेटीमध्ये रक्तदाब, वजन आणि ओटीपोट तपासणी यासारख्या नियमित तपासणीचा समावेश असेल. हिमोग्लोबिनची पातळी तपासण्यासाठी आपल्याला रक्त तपासणी करण्यास सांगितले जाऊ शकते. रक्तातील हिमोग्लोबिनच्या पातळीवर आधारित, योग्य लोह पूरक आहार घेण्याची सूचना केली जाते. जर आपला रक्तगट नकारात्मक (आरएच नकारात्मक) असेल तर, आपली रोगप्रतिकारक स्थिती (आयसीटी चाचणी) तपासल्यानंतर आपल्या रक्तातील कोणत्याही प्रतिपिंडांचा (अँटीबॉडीज) सामना करण्यासाठी आपल्याला अँटी-डी इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.
गर्भावस्थेत धनुर्वात (टिटॅनस) संसर्ग होण्याची शक्यता असते. हा संसर्ग गर्भामध्ये संक्रमित होऊ शकतो आणि आई आणि बाळ दोघांसाठी जीवघेणा ठरू शकतो. नवशिशूंमधील धनुर्वात हा एक गंभीर आजार आहे जो नवजात अर्भकांवर परिणाम करतो. याचा नवजात बालकावर परिणाम होतो कारण त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती नसते. त्यामुळे गर्भवती महिलांनी टिटॅनस टॉक्सॉइड लस घेणे जास्त महत्त्वाचे आहे.
लसीकरणाद्वारे धनुर्वात (टिटॅनस) प्रतिबंधित होतो. लसीकरणानंतर आपल्या शरीरात तयार झालेली प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) आपल्या गर्भशिशूकडे जातात आणि जन्मानंतर काही महिने बाळाचे संरक्षण करतात. धनुर्वातापासून आपले आणि आपल्या बाळाचे संरक्षण करण्यासाठी, टिटॅनस टॉक्सॉइड (टीटी) इंजेक्शनचे दोन डोस दिले जातात. हे ६ आठवड्यांच्या अंतराने दिले जाते आणि पहिला डोस बहुधा गर्भधारणेच्या २६ ते २८ आठवड्यांच्या दरम्यान दिला जातो.
२८ ते ३२ आठवड्यांच्या दरम्यान गर्भधारणा अल्ट्रासाउंड स्कॅन नेम ग्रोथ आणि गर्भाच्या वाढीचा आढावा घेण्यासाठी स्कॅनची शिफारस केली जाते. हे स्कॅन आपल्या बाळाची वाढ किती चांगल्या प्रकारे होत आहे हे तपासण्यास मदत करते. या स्कॅनदरम्यान बाळाच्या डोक्याचा (एचसी) आणि बाळाच्या पोटाचा (एसी) परिघ, बाळाच्या मांडीच्या हाडाची (एफएल) लांबी आणि बाळाच्या सभोवतालच्या अम्निओटिक फ्लुइडची खोली मोजून बाळाच्या शरीराचा आकार समजतो. जर मोजमाप सामान्य मर्यादेत असेल तर आपल्या बाळाची वाढ अगदी योग्य होत असल्याचे संकेत आहेत. जर आपले बाळ अपेक्षेपेक्षा मोठे किंवा लहान असेल तर आपल्याला दोन आठवड्यांनंतर दुसऱ्या स्कॅनचा सल्ला दिला जाऊ शकतो. हे सलग स्कॅन बाळाच्या वाढीचा अचूक मागोवा घेण्यास आणि आवश्यक कृती करण्यास मदत करतात.

३० ते ३६ आठवडे

३० ते ३६ आठवडे - गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ - डॉ. वर्षाली माळी
३० ते ३६ आठवडे - गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ - डॉ. वर्षाली माळी
या टप्प्यापर्यंत बाळाची वाढ चांगली झालेली असते आणि आपण प्रसुति होण्याच्या म्हणजेच बाळाच्या आगमनाच्या अगदी जवळ असतात. त्यामुळे या काळात प्रसुतिपूर्व तपासणी किंवा भेटी वाढवल्या जातात. या काळात दर दोन आठवड्यातून एकदा क्लिनिकला भेट द्यावी लागू शकते.
या भेटींमध्ये रक्तदाब, वजन आणि बाळाची वाढ या गोष्टी समजून घेण्यासाठी ओटीपोटाचा आकार मोजला जातो. बाळाच्या हृदयाचे ठोके आणि स्थिती या काळात तपासली जाते. या काळात बाळाच्या हृदयाचे ठोके आणि बाळ कुठल्या स्थितीमध्ये आहे हे तसापले जाते. तसेच योग्य स्थितीमध्ये स्थिरावले आहे की नाही हे या तपासणीमध्ये लक्षात येते. यावेळी स्तन तपासणीदेखील केली जाते. यामध्ये स्तनपानाची तयारी कशी करावी याबद्दल सल्ला दिला जातो. ३६ व्या आठवड्याच्या तपासणीवेळी टिटॅनस टॉक्सॉइड लसीचा दुसरा डोस दिला जातो.

३७ आणि ३८ वा आठवडा

३७ आणि ३८ वा आठवडा - गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ - डॉ. वर्षाली माळी
३७ आणि ३८ वा आठवडा - गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ - डॉ. वर्षाली माळी
गर्भावस्थेच्या ३६ आठवड्यांनंतर, तुम्हाला आठवड्यातून एकदा क्लिनिकला भेट द्यावी लागते. या भेटींमध्ये रक्तदाब, वजन आणि ओटीपोटाचा आकार यासारख्या नियमित तपासणीचा समावेश आहे. बाळाच्या हृदयाचे ठोके आणि स्थितीची तपासणी केली जाते. जर या काळात ही प्रक्रिया झाली नसेल तर स्कॅन आणि रंगीत डॉपलर अभ्यास करण्याची शिफारस केली जाते.
आपण आता बाळंतपणाच्या जवळ असल्याने, बाळाची स्थिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. गर्भशिशू ब्रीच स्थितीमध्ये आहे की नाही हे तपासण्यासाठी संपूर्ण पोटाची तपासणी केली जाते. ब्रीच स्थिती म्हणजे, गर्भशिशू आपल्या गर्भाशयाच्या तळाशी आणि डोके वर अशा स्थितीत असते. गर्भावस्थेत, आपले गर्भशिशू आपल्या गर्भाशयात फिरत असते. संपूर्ण गर्भावस्थेत शिशू गर्भाशयात फिरत असते परंतु, गर्भावस्थेच्या आठव्या महिन्याच्या आसपास गर्भशिशू एकाच स्थितीत स्थिरस्थावर होते. डोके खाली असलेली स्थिती उत्तम आणि सामान्य असते. सुमारे ९६ टक्के बालके याच स्थितीमध्ये असतात. परंतु, काही गर्भशिशू पाय खाली आणि डोके किंवा ब्रीच स्थितीमध्ये स्थिर होतात. गर्भावस्थेचे ३८ आठवडे पूर्ण करणे सिझेरियन प्रसूतीसाठी चांगली वेळ आहे. जर आपले गर्भशिशू ब्रीच स्थितीत असेल किंवा सिझेरियन करणारी परिस्थिती असेल तर अशा परिस्थितीत या सप्ताहात आपल्या प्रसुतीचे सिझेरियन द्वारे नियोजन केले जाऊ शकते.
आता काही दिवस किंवा काही तासांतच बाळाचे आगमन होणार असते, म्हणून आपल्याला काही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टर किंवा दवाखान्यात याची माहिती देण्याविषयी सांगितले जाते. या लक्षणांमध्ये ओटीपोटात वेदना, योनीतून पाण्याचा स्राव होणे, गर्भाच्या हालचाली कमी होणे, योनीतून रक्तस्त्राव होणे यांचा समावेश आहे. या काळात तुम्हाला एपिड्युरल एनाल्जेसिया किंवा वेदनारहित प्रसुतिविषयी मार्गदर्शन केले जाते.

३९ वा आठवडा

३९ वा आठवडा - गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ - डॉ. वर्षाली माळी
३९ वा आठवडा - गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ - डॉ. वर्षाली माळी
या काळात तुम्ही गर्भावस्थेच्या जवळजवळ शेवटच्या टप्प्यात येतात. या काळात केव्हाही प्रसुति होऊन बाळ तुमच्या बाहुपाशात येण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या ३९ व्या आठवड्यातील गर्भावस्था तपासणीमध्ये विशेष लक्ष द्यावे लागते. यामध्ये रक्तदाब, वजन यांसारख्या गोष्टींबरोबरच बाळाच्या हृदयाचे ठोके आणि स्थिती यावर लक्ष केंद्रित केले जाते. तसेच काही जोखीम किंवा असामान्य गोष्ट असल्यास योग्य ते पाऊल उचलले जाते.

४० वा आठवडा

४० वा आठवडा - गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ - डॉ. वर्षाली माळी
४० वा आठवडा - गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ - डॉ. वर्षाली माळी
जर आतापर्यंत तुम्ही बाळाला जन्म दिला नसेल तर नियमित तपासणीसह, योनिमार्गाच्या प्रसूतीसाठी आपल्या गर्भाशय ग्रीवाची अनुकूलता तपासण्यासाठी योनिमार्गाची तपासणी केली जाते. आपल्याला बाळाच्या योग्य वाढीची तपासणी करण्यासाठी नॉनस्ट्रेस चाचणी, अल्ट्रासाउंड आणि बायोफिजिकल प्रोफाइल यासारख्या पोस्ट-डेट चाचण्या करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. सर्व काही ठीक आहे की नाही हे पाहण्यासाठी काही तपासण्या केल्या जातात आणि प्रसुतिवेदना सुरू व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले जातात. बहुतेक प्रसुतिवेदना नैसर्गिकरित्या सुरू होतात, परंतु कधीकधी जन्म प्रक्रियेला थोडी मदतीची गरज भासू शकते. कृत्रिम प्रसुति वेदना सुरू करण्यासाठी काही औषधे वापरली जातात.

प्रसूतीपूर्व / गर्भधारणा तपासणी वेळापत्रक सारांश

आपल्या गर्भावस्था तपासणी भेटीदरम्यान काय केले जाते याबद्दल आठवड्यांचा तपशील वर देण्यात आला आहे. खाली आपल्या गर्भावस्थेप्रमाणे गर्भधारणा तपासणी आणि अल्ट्रासाउंड स्कॅन वेळापत्रकाचा सारांश देण्यात आला आहे.

दुसरा महिना / मासिक पाळी चुकणे

गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - स्टेथोस्कोप आयकॉन

नियमित प्रसवपूर्व तपासणी

गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - लॅब चाचण्या आयकॉन

गर्भधारणा लघवीद्वारे तपासणी

गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - लॅब चाचण्या आयकॉन

रक्त आणि लघवी तपासणी (एएनसी प्रोफाइल)

गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक -अल्ट्रासाऊंड स्कॅन प्रोब आयकॉन

हृदयाची क्रिया जाणून घेण्यासाठी अल्ट्रासाउंड स्कॅन

तिसरा महिना

गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - स्टेथोस्कोप आयकॉन

नियमित प्रसवपूर्व तपासणी

गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - लॅब चाचण्या आयकॉन

पहिल्या तिमाहीची सामायिक तपासणी

गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक -अल्ट्रासाऊंड स्कॅन प्रोब आयकॉन

एनटी अल्ट्रासाउंड स्कॅन (सोनोग्राफी) आणि डबल मार्कर चाचणी

चौथा महिना

गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - स्टेथोस्कोप आयकॉन

नियमित प्रसवपूर्व तपासणी

पाचवा महिना

गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - स्टेथोस्कोप आयकॉन

नियमित प्रसवपूर्व तपासणी

गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक -अल्ट्रासाऊंड स्कॅन प्रोब आयकॉन

अनोमली किंवा अल्ट्रासाउंड लेव्हल २ स्कॅन

सहावा महिना

गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - स्टेथोस्कोप आयकॉन

नियमित प्रसवपूर्व तपासणी

Pregnancy check up and scan injection syringe dose icon

टिटॅनस टॉक्साइड इंजेक्शनचा पहिला डोस

सातवा महिना

गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - स्टेथोस्कोप आयकॉन

दोन आठवड्यांनी नियमित प्रसवपूर्व तपासणी

Pregnancy check up and scan injection syringe dose icon

टिटॅनस टॉक्साइड इंजेक्शनचा दुसरा डोस

Pregnancy checkup and scan ultrasound scan probe icon

गर्भशिशूची वाढ पाहण्यासाठी अल्ट्रासाउंड स्कॅन

गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - लॅब चाचण्या आयकॉन

रक्त तपासणी

आठवा महिना

गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - स्टेथोस्कोप आयकॉन

आठवड्यातून एकदा नियमित प्रसवपूर्व तपासणी

नववा महिना

गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - स्टेथोस्कोप आयकॉन

आठवड्यातून एकदा नियमित प्रसवपूर्व तपासणी

गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक -अल्ट्रासाऊंड स्कॅन प्रोब आयकॉन

गर्भशिशूची वाढ पाहण्यासाठी अल्ट्रासाउंड स्कॅन

गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - लॅब चाचण्या आयकॉन

नॉनस्ट्रेस टेस्ट

गरोदरपणातील चाचण्यांचे वेळापत्रक - लॅब चाचण्या आयकॉन

रक्त तपासणी

गर्भधारणा अल्ट्रासाउंड स्कॅन आणि गर्भधारणा तपासणी भेटींची संख्यांची ही मानक यादी आहे. आपले गर्भधारणापूर्व आरोग्य, गर्भाची प्रगती आणि गर्भशिशूची वाढ कशी होते आहे याच्यावरून या वेळापत्रकात थोडेसे बदल होऊ शकतात. या सर्व टप्प्यांवर प्रश्न विचारण्यास आणि आपल्या शंकांचे निरसन करण्यास मागेपुढे पाहू नका. सुरुवातीच्या काळात हे वेळापत्रक व्यस्त वाटेल. परंतु, हा प्रवास आनंददायी असतो. यातला प्रत्येक क्षण तुमच्या कायम लक्षात राहतो. हे वेळापत्रक समजून घेण्यासाठी आणि सर्व टप्प्यांचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपल्या प्रसुति किंवा स्रीरोग तज्ज्ञांचा वेळोवेळी सल्ला घ्या.
या लेखाची प्रत डाउनलोड करा, ठेवा आणि शेअर करा.

हे ही वाचा

गर्भवती होणं आणि त्यानंतर मातृत्व अनुभवणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला मोठा निर्णय असतो. गर्भावस्था हा एक प्रवास आहे आणि त्याची सुरुवात मला आई व्हायचे आहे या विचाराने होते. त्यामुळे गर्भवती होण्यासाठी काय करावे आणि आई होण्याचा प्रवास सुखकर कसा होईल याची माहिती तुम्हाला मिळणे आवश्यक आहे. ही माहिती देणारे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षाली माळी यांनी लिहिलेले काही लेख खाली दिले आहेत. हे लेख आपल्याला गर्भावस्थेचा प्रवास सुरक्षित, निरोगी आणि अधिक आनंददायक बनविण्यात मदत करतील.

सदस्य व्हा

आणि डॉ. वर्षाली माळी यांच्याकडून आरोग्यविषयक सूचना मिळवा.

तुमची सदस्यता जतन केली जाऊ शकली नाही. कृपया पुन्हा प्रयत्न करा.
तुम्ही डॉ. वर्षालीच्या स्त्रीरोग चिकित्सालयाच्या आरोग्य अपडेट्सचे यशस्वीपणे सदस्यत्व घेतले आहे.

Pregnancy calculators

Estimate important pregnancy dates accurately

Calendar icon - Pregnancy due date calculator - Dr. Varshali Mali - Gynecologist

Accurate estimation of your baby's arrival !!

Expecting a baby and want to know the arrival date? Use this pregnancy due date calculator to see the duedate by week, by month, and the pregnancy progress.
Ovulation period icon - Dr. Varshali Mali - Gynecologist

Know the best ovulation days to get pregnant

Want to get pregnant? Want to know your best fertility days? Use this ovulation calculator to know your ovulation period, symptoms, and best ovulation days to get pregnant.

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ

डॉ. वर्षाली माळी या प्रसुती शास्त्र आणि स्त्रीरोग शास्त्रात प्रवीण असून या क्षेत्रात कार्यरत आहेत. पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर डीएनबी (प्रसुतिशास्त्र व स्त्रीरोग शास्त्र) यामध्ये जिहांगीर हॉस्पिटल पुणे येथून पद्व्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच युनिवर्सिटी ऑफ श्लेस्विग होलस्टाइन, जर्मनी येथून गायनेकॉलॉजीकल एन्डोस्कोपी या विषयात डिप्लोमा पूर्ण केला आहे. प्रसुती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून त्यांना अनेक वर्षांचा गाढा अनुभव आहे. तसेच या विषयात त्या व्याख्याता म्हणूनदेखील मार्गदर्शन करतात. पुण्यातील मारुंजी येथील लाइफ रिपब्लिक टाउनशिपमध्ये त्यांचे चिकित्सालय असून हिंजवडी, वाकड आणि उपनगरांतील स्त्रियांना त्या वैद्यकीय सेवा देतात. हसतमुख आणि आश्वासक स्वभाव, प्रसुती आणि स्त्रीरोगांविषयी सखोल ज्ञान यामुळे स्त्रियांना त्यांचे मार्गदर्शन फायदेशीर आणि मदत करणारे ठरते आहे. डॉ. वर्षाली या दोन मुलींच्या आई असून मातृत्व ही सर्वांगसुंदर भेट असल्याचे त्या मानतात. आपले ज्ञान आणि शिक्षणाचा स्त्रियांना फायदा व्हावा यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.

प्रश्न?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूती डॉक्टरांना विचारा आणि उत्तरे मिळवा.

अपॉइंटमेंट

डॉ. वर्षाली माळी या अनुभवी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आहेत. तिच्यासोबत भेटीची वेळ बुक करा आणि सर्वोत्तम सल्ला, काळजी आणि उपाय मिळवा.
भाषा बदला. - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय