डॉ. वर्षाली माळी, एमबीबीएस, डीएनबी - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ.

प्रश्न आहे का?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभव प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञांना विचारा आणि त्वरित उत्तर मिळवा.
प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ यांना संदेश पाठवा - डॉ. वर्षाली माळी
नैसर्गिक पद्धतींचा वापर करून गर्भधारणा कशी टाळावी?
नैसर्गिक पद्धतींचा वापर करून गर्भधारणा कशी टाळावी?

नैसर्गिक पद्धतींचा वापर करून गर्भधारणा कशी टाळावी?

पद्धती | परिणामकारकता | फायदे व मर्यादा

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर

एमबीबीएस, डीएनबी (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र)

डिप्लोमा इन स्त्रीरोग एन्डोस्कोपी - जर्मनी

नैसर्गिक पद्धतींचा वापर करून गर्भधारणा कशी टाळावी?
काही पुरुष आणि स्त्रिया कोणतेही गर्भनिरोधक साधन वापरण्यास तयार नसतात किंवा अनियोजित गर्भधारणा रोखण्यासाठी औषधे घेण्यास तयारही नसतात. कोणत्याही बाह्य मदतीशिवाय नैसर्गिकरित्या गर्भधारणा कशी टाळता येईल हा अनेक दाम्पत्यांमध्ये चर्चेचा विषय असतो. नैसर्गिक कुटुंब नियोजन म्हणजे अशी गर्भनिरोधक पद्धत की ज्यामध्ये शरीर, त्याची लय आणि त्याचे चक्र समजून घेऊन त्यातून गर्भधारणा टाळण्याचा प्रयत्न केला जातो. या गर्भनिरोधक पद्धतींमध्ये गर्भनिरोधक उपकरणे अथवा औषधे वापरण्याची गरज नसते. नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा टाळण्याचे अनेक मार्ग आहेत.
प्रजनन जागरुकता पद्धतीमध्ये आपल्या मासिक पाळीचा मागोवा घेतला जातो. ज्यामध्ये प्रजननक्षम दिवस आणि गर्भवती होण्याची सर्वाधिक शक्यता केव्हा आहे हे समजून घेतले जाते. मासिक पाळी आणि प्रजननक्षम दिवस यांचा अभ्यास करून नैसर्गिकरित्या गर्भधारणा टाळली जाते. यामध्ये स्रीबीजांपासून शुक्रांणूना दूर ठेवून गर्भधारणा टाळली जाते. स्तनपान किंवा लॅक्टेशनल अमेनोरिया पद्धत ओव्हुलेशन थांबवून गर्भधारणा टाळण्यास मदत करते.
या लेखात नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धती आणि त्यांचा प्रभावीपणे वापर करून गर्भधारणा कशी टाळता येईल याबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे. प्रत्येक पद्धतीच्या तपशीलात जाण्यास सुरुवात करण्यापूर्वी, आधी आपण मासिक पाळी म्हणजे काय आणि गर्भधारणा कशी होते हे समजून घेऊयात.
मासिक पाळी चक्र आणि गर्भधारणा कशी होते?

मासिक पाळी चक्र आणि गर्भधारणा कशी होते?

मासिक पाळी - गर्भाशय आयकॉन

पहिला ते सातवा दिवस : गर्भाशयाचे अस्तर तुटते आणि मासिक पाळी येते

मासिक पाळी - गर्भाशय आयकॉन

आठवा ते अकरावा दिवस : अंड्याची तयारी करण्यासाठी गर्भाचे अस्तर तयार होते

मासिक पाळी - गर्भाशय आयकॉन

बारावा ते सतरावा दिवस : ओव्हुलेशन होते (सहसा १४ व्या दिवशी)

मासिक पाळी - गर्भाशय आयकॉन

अठरा ते पंचवीसावा दिवस : जर प्रजनन झाले नसेल तर कॉपर्स ल्युटिअम नाहीसे होते

मासिक पाळी - गर्भाशय आयकॉन

सव्वीस ते अठ्ठावीसावा दिवस : गर्भाशयाचे अस्तर तुटल्यामुळे मासिक पाळी येते

मासिक पाळी चक्र आणि गर्भधारणा कशी होते?
साधारणपणे स्त्रीचे मासिक पाळी चक्र २८ दिवसांचे असते. हा कालावधी कधीकधी एक-दोन दिवसांच्या अंतराने कमी जास्त होऊ शकतो. मासिक पाळी चक्र तीन टप्प्यांमध्ये विभागलेले असते.
मासिक पाळी - गर्भाशय आयकॉन

पहिला टप्पा : मासिक पाळीच्या या टप्प्यात रोज रक्तस्राव होतो. मासिक पाळीचा हा कालावधी साधारणपणे पाच ते सात दिवसांचा असतो. या काळात गर्भाशयाचे अस्तर दाट होऊन त्यावर नवीन अस्तर तयार होण्यास सुरुवात होते.

मासिक पाळी - गर्भाशय आयकॉन

दुसरा टप्पा : या टप्प्यामध्ये आपल्या गर्भाशयाचे अस्तर हे बीजांडाने प्रजननासाठी गर्भाशयात प्रवेश करावा, यासाठी मार्ग तयार करते. सामान्यतः हे अस्तर पुढील सात दिवस टिकते. जेव्हा आपल्या अंडाशयातून बीजांड सोडले जाते तो दिवस सामान्यतः ओव्हुलेशनचा दिवस असतो.

मासिक पाळी - गर्भाशय आयकॉन

तिसरा टप्पा : या टप्प्यात आपले गर्भाशय शुक्राणूंचा अंड्यात प्रवेश करण्याची आणि प्रजनन होण्याची प्रतीक्षा करते. जर गर्भधारणा झाली नाही तर गर्भाशयाचे अस्तर कमी होण्यास सुरुवात होते आणि त्यावर शेवटी नवीन अस्तर तयार होण्यास सुरुवात होते. यातून मासिक पाळीचे नवीन चक्र सुरू होते.

जेव्हा पुरुषाचे शुक्राणू आणि स्त्रीच्या बीजाचे मिलन होते तेव्हा गर्भधारणा होत असते. जेव्हा एखाद्या स्त्रीचे अंडाशय बीज सोडते तेव्हा ते केवळ १२ ते १४ तास जगते. तर पुरुषाचे शुक्राणू सुमारे तीन दिवस जगतात. २८ दिवसांच्या सामान्य मासिक पाळी चक्राचा विचार करता एक स्त्री सामान्यतः १४ व्या दिवसाच्या आसपास प्रजननक्षम होते. जर एखाद्या पुरुषाचे शुक्राणू गर्भाशयात उपलब्ध असतील तर गर्भधारणा होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये ओव्हुलेशन १२, १३ किंवा १४ दिवसांच्या आसपास होऊ शकते. ओव्हुलेशन म्हणजे जेव्हा एखादी स्री प्रजननसाठी बीज बाहेर सोडते. ओव्हुलेशन हे महिलेच्या मासिक पाळीवर अवलंबून असते. काही स्रियांचे मासिक पाळी चक्र हे जास्त दिवसांचे असते तर काही स्रियांचे मासिक पाळी चक्र हे २८ दिवसांपेक्षा कमी असते. त्यामुळेच मासिक पाळी चक्र म्हणजे काय? आणि ओव्हुलेशन कधी होते? हे जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. नैसर्गिकरित्या गर्भधारणा टाळणे हे आपण आपल्या ओव्हुलेशन दिवसाचा अचूक अंदाज किती अचूकपणे लावू शकतो यावर अवलंबून आहे.
आतापर्यंत आपण मासिक पाळी चक्र म्हणजे काय? आणि गर्भधारणा कशी होते? याविषयी माहिती घेतली. आता वेगवेगळ्या नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धती आणि या पद्धतींचा वापर करून गर्भधारणा कशी टाळता येईल हे पाहुयात.

गर्भधारणा टाळण्यासाठी तुमचे ओव्हुलेशन दिवस जाणून घ्या.

तुमचा ओव्हुलेशन कालावधी, लक्षणे आणि ओव्हुलेशन दिवस जाणून घेण्यासाठी हे ओव्हुलेशन कॅल्क्युलेटर वापरा. तुमच्या माहितीच्या आधारे, कॅल्क्युलेटर पुढील तीन मासिक पाळीसाठी प्रजनन दिवसांचा अंदाज लावेल.
प्रजनन जागरुकता नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धत

प्रजनन जागरुकता गर्भनिरोधक पद्धत

प्रजनन जागरुकता नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धत - प्रकार
प्रकार : नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धत
प्रजनन जागरुकता नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धत - प्रभावी
प्रभावी : ७६ ते ८८ %
प्रजनन जागरुकता नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धत - किती वेळा वापरावी लागते
किती वेळा वापरावी लागते : रोज
प्रजनन जागरुकता नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धत - लैंगिक आजारांपासून संरक्षण
लैंगिक आजारांपासून संरक्षण : नाही
प्रजनन जागरुकता नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धत
प्रजनन जागरुकता पद्धत ही नैसर्गिकरित्या गर्भधारणा टाळण्याच्या पद्धतींपैकी एक आहे. कुटुंब नियोजनासाठी पसंती दिल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक पद्धतींपैकी ही एक पद्धत मानली जाते. यामध्ये आपल्या मासिक पाळीचा मागोवा घेतला जातो. जेणेकरून गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त असते तेव्हा आपल्याला त्याची कल्पना मिळते. ओव्हुलेशनच्या जवळचे दिवस किंवा अंडाशय स्रीबीज सोडतात त्या कालावधीत आपण गर्भवती होण्याची शक्यता जास्त असते. हे दिवस इतर कोणत्याही गर्भनिरोधक पद्धतींचा वापर न करता लैंगिक संबंध ठेवण्यास असुरक्षित मानले जातात. आपले मासिक पाळी चक्राचे २८ दिवस लक्षात घेता ७ ते २१ दिवसांच्या दरम्यानचे दिवस गर्भधारणेसाठी अनुकुल असतात. या दिवसांमध्ये स्रीबीज बाहेर पडतात आणि शुक्राणू त्यांना सहजपणे फलित करू शकतात. एकदा तुम्हाला तुमचे ओव्हुलेशन आणि प्रजननक्षम काळाचे दिवस अचूकपणे माहित झाल्यानंतर आपण या दिवसात लैंगिक संबंध न ठेवता गर्भधारणा टाळू शकता.
प्रजनन जागरुकता पद्धतींद्वारे नैसर्गिकरित्या गर्भधारणा कशी टाळावी हे आपण आपल्या ओव्हुलेशन आणि प्रजननक्षम दिवसांचा अंदाज किती अचूकपणे लावू शकतो यावर अवलंबून असते. याचा अचूक अंदाज बांधणे कठीण आहे. आपल्या प्रजनन लक्षणांचा मागोवा घेण्यासाठी शिस्त आणि काही पद्धतींचे अवलंब करणे आवश्यक आहे. प्रजनन चिन्हांचा माग काढण्याच्या तीन मुख्य पद्धती आहेत. यातील पहिली पद्धत तापमान मोजणी पद्धती आहे. ज्यामध्ये रोज सकाळी शरीराचे तापमान मोजले जाते. त्यानंतर येते गर्भाशय ग्रीवाच्या श्लेष्माची पद्धत जिथे दररोज आपल्या गर्भाशयाच्या खालील भागातून होणार योनीस्त्राव तपासला जातो. तिसरी पद्धत म्हणजे दिनदर्शिका पद्धत यामध्ये आपल्या मासिक पाळी चक्राचा तक्ता तयार केला जातो. प्रजनन चिन्हे प्रभावीपणे शोधण्यासाठी आणि या नैसर्गिक पद्धतीचा अचूकता वाढविण्यासाठी या पद्धतींचे एकत्रीकरण करणे ही उत्तम कल्पना आहे.
फायदे
या गर्भनिरोधक पद्धतीचा मोठा फायदा म्हणजे आरोग्याला कोणताही धोका नसतो. कोणतेही संप्रेरक किंवा रसायने आपल्या शरीरात प्रवेश करत नाहीत. तसेच लैंगिक जीवन आणि आनंदावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही. यात कोणताही खर्च करावा लागत नाही आणि गर्भधारणा टाळण्यासाठी कोणती वैद्यकीय मदत किंवा पूर्वतयारी आवश्यक नाही.
तोटे
प्रजनन जागरुकता पद्धतींद्वारे गर्भधारणा कशी टाळायची हे आपण आपल्या ओव्हुलेशन आणि प्रजनन दिवसांचा अंदाज किती अचूकपणे लावू शकता यावर अवलंबून असते. प्रजनन चिन्हे शोधण्यासाठी कौशल्य आणि शिस्तीची आवश्यकता असते. आपण खरोखर दिनदर्शिकेवर बारकाईने लक्ष ठेवायला हवे आणि आपल्या मासिक पाळीचा मागोवा ठेवला पाहिजे. ज्यांना नियमित पाळी येते त्यांच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे. नैसर्गिकरित्या गर्भधारणा टाळण्यासाठी इतर गर्भनिरोधक पद्धतींप्रमाणेच, ही पद्धत लैंगिकरित्या संक्रमित होणाऱ्या आजारांपासून संरक्षण होण्यास मदत करत नाही. फक्त हीच पद्धत गर्भधारणा टाळण्यासाठी वापरल्यास ते फारसे प्रभावी ठरत नाही. असे दिसून आले आहे की, अनेक जोडपी गर्भधारणा टाळण्यासाठी केवळ प्रजनन जागरुकता पद्धतीवर अवलंबून असतात आणि बहुतेकवेळा अनियोजित गर्भधारणेचा त्यांना सामना करावा लागतो. जर आपण गर्भधारणा टाळण्यासाठी किंवा कुटुंब नियोजनासाठी केवळ या गर्भनिरोधक पद्धतीचा वापर करीत असाल तर आपले मासिक पाळी आणि प्रजननक्षम दिवस समजून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

गर्भधारणा टाळण्यासाठी तुमचे ओव्हुलेशन दिवस जाणून घ्या.

तुमचा ओव्हुलेशन कालावधी, लक्षणे आणि ओव्हुलेशन दिवस जाणून घेण्यासाठी हे ओव्हुलेशन कॅल्क्युलेटर वापरा. तुमच्या माहितीच्या आधारे, कॅल्क्युलेटर पुढील तीन मासिक पाळीसाठी प्रजनन दिवसांचा अंदाज लावेल.
अवरुद्ध नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धत

अवरुद्ध गर्भनिरोधक पद्धत

अवरुद्ध नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धत - प्रकार
प्रकार : नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धत
अवरुद्ध नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धत - प्रभावी
प्रभावी : ७८ %
अवरुद्ध नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धत - किती वेळा वापरावी लागते
किती वेळा वापरावी लागते : नेहमी
अवरुद्ध नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धत - लैंगिक आजारांपासून संरक्षण
लैंगिक आजारांपासून संरक्षण : नाही
अवरुद्ध नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धत
नैसर्गिकरित्या गर्भधारणा टाळण्याची ही अजून एक पद्धत आहे. या पद्धतीमध्ये वीर्य किंवा शुक्राणूंना योनीपासून दूर ठेवले जाते. या पद्धतीत पुरुष जोडीदार शुक्राणूंना योनीमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी स्खलन होण्याआधीच स्वतःला मागे घेतो. योनीपासून दूर स्खलन केल्याने वीर्य योनीमध्ये प्रवेश करत नाही व गर्भधारणा टाळली जाते. वीर्याच्या फक्त एका थेंबामुळेदेखील गर्भधारणा होऊ शकते, म्हणून कोणतेही वीर्य बाहेर येण्यापूर्वी स्वतःला मागे घेणे हे खूप आवश्यक असते.
अवरुद्ध पद्धतीचे कार्य उत्तम होण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या किंवा कंडोमसारख्या इतर गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करणे आवश्यक आहे. इतर गर्भनिरोधक पद्धती वापरल्यामुळे, वीर्याचा थेंब बाहेर पडले तरीही गर्भधारणेपासून सुरक्षा मिळते. अवरुद्ध पद्धतीबरोबर कंडोमचा वापर हा खूप प्रभावी ठरतो. कंडोम हे वीर्याचा थेंब बाहेर पडले तर गर्भधारणेपासून सुरक्षा देतो आणि लैंगिक आजारांपासूनही सुरक्षा देतो. तसेच अवरुद्ध पद्धतीचा सराव करण्यासाठी कंडोम या गर्भनिरोधक पद्धतीचा वापरदेखील फायदेशीर ठरतो. अवरुद्ध गर्भनिरोधक पद्धतीचा प्रभावीपणे वापर करून गर्भधारणा कशी टाळायची हे आपण वेळेचे गणित किती अचूकपणे करतो यावर अवलंबून असते. यासाठी तुमचा सराव असणे आणि स्वतःवर नियंत्रण असणे आवश्यक आहे. आपण गर्भधारणा टाळण्यासाठी किंवा कुटुंब नियोजनासाठी केवळ नैसर्गिक पद्धतीवर अवलंबून असल्यास ऐनवेळी वापरता येईल अशा पद्धतींपैकी एखाद्या पद्धतीचा पर्याय हाताशी ठेवणे कधीही योग्य ठरते.
फायदे
या नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धतीत आरोग्याला कोणताही धोका नसतो. तसेच कोणतेही संप्रेरक किंवा रसायने शरीरात प्रवेश करत नाहीत. संभोगाच्या आधी किंवा नंतर कोणतीही तयारी करावी लागत नाही. जर तुमचे स्वतःवर चांगले नियंत्रण असेल तर तुम्ही गर्भधारणा टाळण्यासाठी या पद्धतीचा प्रभावीपणे वापर करू शकता.
तोटे
ही गर्भनिरोधक पद्धत गर्भधारणा टाळण्यासाठी सर्वात अविश्वसनीय पद्धतींपैकी एक मानली जाते. यामध्ये अयशस्वी होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. यासाठी बऱ्याच गोष्टींवर नियंत्रण ठेवावे लागते. तसेच याचा लैंगिक समाधान मिळण्यावरही परिणाम होतो. अवरुद्ध पद्धतीचा वापर करून नैसर्गिकरित्या गर्भधारणा टाळणे हे थेट तुमच्या भावनिक आणि शारीरिक नियंत्रणावर अवलंबून असते. लैंगिक संबंध ही अतिशय सक्रिय प्रक्रिया आहे आणि त्यात ही पद्धत अयशस्वी होण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणून गर्भधारणा टाळण्यासाठी आणि उत्तम कुटुंब नियोजनासाठी अवरुद्ध पद्धतीसह इतर काही गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करणे अत्यंत गरजेचे आणि योग्य ठरते. तसेच हे लक्षात घ्या की, ही गर्भनिरोधक पद्धत लैंगिक आजारांपासूदेखील संरक्षण करत नाही. त्यामुळे अवरुद्ध पद्धतीत कंडोमचा वापर करणे योग्य पर्याय ठरतो. कंडोम वापरल्याने लैंगिक आजारांपासूनदेखील संरक्षण मिळते आणि गर्भधारणा टाळण्यासाठी अतिरिक्त कवच म्हणूनदेखील काम करतो.
स्तनपान नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धत

स्तनपान गर्भनिरोधक पद्धत

स्तनपान नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धत - प्रकार
प्रकार : नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धती
स्तनपान नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धत - प्रभावी
प्रभावी : ९८ %
स्तनपान नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धत - किती वेळा वापरावी लागते
किती वेळा वापरावी लागते : दर दिवशी ४ ते ५ तास
स्तनपान नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धत - लैंगिक आजारापासून संरक्षण
लैंगिक आजारापासून संरक्षण : नाही
स्तनपान नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धत
स्तनपान देणे हे आपल्या बाळाच्या मानसिक आणि शारीरिक वाढीसाठी फायदे देते हे आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर स्तनपान हे नैसर्गिकरित्या गर्भधारणा टाळण्याची एक प्रभावी पद्धतदेखील आहे. बाळाला दिवसातून साधारणपणे दर चार तासांनी आणि रात्री दर सहा तासांनी स्तनपान करणे आवश्यक असते. जेव्हा तुम्ही बाळाला नियमित अंतराने स्तनपान करता तेव्हा तुमचे शरीर स्त्रीबीज निर्मिती करणे थांबवते. स्त्रीबीज निर्मिती झाली नाही तर गर्भधारणा होत नाही आणि मासिक पाळीदेखील येत नाही. म्हणूनच स्तनपान करण्याला लॅक्टेशनल अमेनोरिया पद्धत असेही म्हणतात. लॅक्टेशनल म्हणजे स्तनपान आणि अमेनोरिया म्हणजे मासिक पाळी न येणे.
जर तुम्ही बाळाला स्तनपानाशिवाय इतर काही खायला दिले तर ही नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धती कार्य करीत नाही. तसेच ब्रेस्ट पंप वापरल्यावर देखील ही पद्धत कार्य करत नाही. गर्भधारणा टाळण्यासाठी या पद्धतीचा वापर करायचा असेल तर आपल्या बाळाला स्तनपान देणे आवश्यक असते. याचबरोबर हेदेखील लक्षात ठेवा की, ही गर्भनिरोधक पद्धत आपल्या बाळाच्या जन्मापासून केवळ पहिले सहा महिने ते मासिक पाळी पुन्हा सुरू होईपर्यंत कुटुंब नियोजनासाठी वापरली जाऊ शकते. हा कालावधी उलटल्यानंतर या गर्भनिरोधक पद्धतीचा प्रभाव कमी होऊ लागतो. त्यामुळे गर्भधारणा टाळण्यासाठी आणि चांगल्या कुटुंब नियोजनासाठी इतर काही प्रभावी पद्धतींचा विचार करणे आवश्यक आहे.
फायदे
नैसर्गिकरित्या गर्भधारणा टाळण्यासाठी स्तनपान ही एक प्रभावी पद्धत आहे. गर्भधारणा रोखण्यासाठी हा एक सोपा, सुरक्षित आणि मुक्त मार्ग आहे. एकदा आपण स्तनपान सुरू केले की ते त्वरित गर्भधारणा रोखण्यासाठी सुरुवात करते. या गर्भनिरोधक पद्धतीमध्ये कोणत्याही डॉक्टरांच्या चिठ्ठीची किंवा वैद्यकीय प्रक्रियेची आवश्यकता नसते. या पद्धतीमुळे लैंगिक जीवनात अडथळा येत नाही तसेच लैंगिक जीवनातील आनंदावरही विपरित परिणाम होत नाही.
तोटे
स्तनपानाचा वापर करून नैसर्गिकरित्या गर्भधारणा कशी टाळावी यातदेखील काही मर्यादा आणि तोटे आहेत. पहिला तोटा असा आहे की, आपल्याला नियमित काही अंतराने आपल्या बाळाला स्तनपान करणे आवश्यक आहे. कधीकधी तुमच्यात स्तनपान करण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा पुरेशी नसते आणि पुरेसा वेळदेखील नसतो. बाळामध्येदेखील दूध चोखण्याइतके त्राण असणे आवश्यक असते. ह्या कारणांमुळे नियमित अंतराने स्तनपान देणे अवघड होते. मुख्य मर्यादा ही आहे की, बाळाच्या जन्मानंतर फक्त सहा महिन्यांपर्यंतच ही पद्धत उत्तम कार्य करते. त्यामुळे उत्तम कुटुंब नियोजनासाठी तुम्ही इतर गर्भनिरोधक पद्धतींचा विचार करून त्यांचा वापर करायला हवा. तसेच या पद्धतीत लैंगिक आजारांपासूनही संरक्षण मिळत नाही. या पद्धतीसोबत कंडोमचा वापर करणे सुरक्षित ठरू शकते. कारण यामुळे लैंगिक आजारांपासून संरक्षण होण्यासोबतच गर्भधारणादेखील टाळता येते.
संयम म्हणजेच ब्रह्मचर्य नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धत

संयम म्हणजेच ब्रह्मचर्य गर्भनिरोधक पद्धत

संयम म्हणजेच ब्रह्मचर्य नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धत - प्रकार
प्रकार : नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धत
संयम म्हणजेच ब्रह्मचर्य नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धत - प्रभावी
प्रभावी : १०० %
संयम म्हणजेच ब्रह्मचर्य नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धत - किती वेळा वापरावी लागते
किती वेळा वापरावी लागते : प्रत्येक वेळी
संयम म्हणजेच ब्रह्मचर्य नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धत - लैंगिक आजारांपासून संरक्षण
लैंगिक आजारांपासून संरक्षण : होय / नाही
संयम म्हणजेच ब्रह्मचर्य नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धत
ब्रह्मचर्य म्हणजे लैंगिक संबंध पूर्णपणे टाळणे होय. ब्रह्मचर्य ही सर्वात प्रभावी गर्भनिरोधक पद्धतींपैकी एक पद्धत आहे. यामध्ये तुम्हाला स्वतःवर संयम ठेवणे गरजेचे असते. ही नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धती १०० टक्के प्रभावी ठरणारी आहे. संयमाचा अर्थ व्यक्तीपरत्वे वेगळा असू शकतो. काही लोकांसाठी संयम म्हणजे कोणत्याही प्रकारचे लैंगिक संबंध न ठेवणे असा होतो. तर काही लोकांसाठी संयम म्हणजे केवळ योनीतून लैंगिक संबंध न ठेवता इतर लैंगिक क्रियांनी संबंध ठेवणे असा आहे. जेव्हा संयमाने गर्भधारणा रोखण्याची वेळ येते, तेव्हा केवळ योनीमार्गातील लैंगिक संबंध टाळणे आवश्यक असते.
ह्या नैसर्गिकरित्या गर्भनिरोधक पद्धतीमध्ये वीर्य यौनीपासून दूर ठेवणे खूप आवश्यक असते. वीर्यातील शुक्राणूंच्या पेशी स्त्रीच्या अंड्यांपासून दूर ठेवल्यास, गर्भधारण होत नाही. जर तुम्ही प्रत्येकवेळी संयमीपणे वागलात आणि योनीतून लैंगिक संबंध टाळलात, तर गर्भधारणा होत नाही. ज्या दिवशी प्रजननक्षम किंवा गर्भवती होण्याची शक्यता अधिक असते अशावेळी लोक गर्भधारणेपासून बचाव करण्यासाठी ह्या पद्धतीचा वापर करतात. जर तुम्ही गर्भधारणा टाळण्यासाठी लैंगिक संबंध टाळत असाल तर कधीकधी तुमच्या जोडीदाराचा गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे बरेचदा तुम्हाला लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा का नाहीये याबद्दल जोडीदाराशी बोलणे ही नेहमी उत्तम गोष्ट ठरते. लक्षात ठेवा की, तुम्ही अनेक प्रकारच्या गर्भनिरोधक पद्धती वापरू शकता. म्हणून, जर तुमचा जोडीदार या पद्धतीने गर्भधारणा टाळण्यास तयार नसेल तर तुम्ही किंवा तुमचा जोडीदार इतर प्रभावी गर्भनिरोधक पद्धतीचा वापर करून गर्भधारणा टाळू शकता. दीर्घकाळात, ही एक चांगली कुटुंब नियोजन पद्धत नाही. तुमच्या जोडीदारासोबत लैंगिक संबंध हा चांगल्या नात्याचा एक महत्त्वाचा पैलू आहे. कौटुंबिक नियोजन आणि गर्भधारणा टाळण्यासाठी लैंगिक संबंध टाळण्यावर अवलंबून राहणे ही तशी चांगली कल्पना नाही. तर याचा सारासार विचार करून व आपल्या जोडीदाराची संमती घेऊनच, या गर्भनिरोधक पद्धतीचा वापर करावा.
फायदे
नैसर्गिकरित्या गर्भधारणा टाळण्यासाठी ही १०० टक्के प्रभावी पद्धत आहे. या पद्धतीत कोणताही खर्च नसतो आणि आरोग्यावरदेखील कोणताच परिणाम होत नाही. यासाठी ना डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज भासते ना कोणत्याही वैद्यकीय प्रक्रियेची.
तोटे
ब्रह्मचर्य म्हणजेच संयमाने नैसर्गिकरित्या गर्भधारणा कशी टाळायची हे आपल्या स्व-नियंत्रणावर अवलंबून असते. लैंगिक संबंधांबाबत आपण स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही याची खात्री असल्यास, इतर गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करा. कारण, लैंगिक संबंधांबाबत तुमचे स्व-नियंत्रण राहिले नाही तर अशावेळी तुम्हाला गर्भधारणा टाळणारे कोणतेच संरक्षण मिळत नाही. त्यामुळे अशावेळी इतर गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करणे आवश्यक ठरते. याचबरोबर फक्त योनीमार्गाने ठेवलेल्या लैंगिक संबंधांमध्ये लैंगिक आजारांचा धोका असतो असे नाही. तोंडावाटे लैंगिक संबंध ठेवल्यास किंवा त्वचेच्या संपर्कात आल्यासही लैंगिक आजारांचे शरीरात संक्रमण होऊ शकते. त्यामुळे लैंगिक आजारांपासून ही पद्धत संरक्षण देत नाही.
गर्भवती होणे आणि आई होणे हा प्रवास खूप आनंददायी आहे. प्रत्येक स्त्रीच्या जीवनात हा क्षण सर्वोच्च आनंदाचा असतो. परंतु, बरेचदा अनियोजित गर्भधारणा होते आणि संपूर्ण नियोजनदेखील विस्कळीत होते. अनपेक्षित गर्भधारणेचा परिणाम सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिक पैलुंवरदेखील मोठ्या प्रमाणात होतो. उत्तम गर्भनिरोधक पद्धत आणि योग्य कुटुंब नियोजन यांचा आधार घेऊन गर्भधारणा टाळून आपल्याला मुल केव्हा हवे आहे याचा निर्णय घेणे शक्य होते.
गर्भधारणा टाळण्यासाठी नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करण्याचे बरेच फायदे आहेत. कोणतेही औषध नाही की डॉक्टरांचा सल्ला किंवा वैद्यकीय प्रक्रिया यात करावी लागत नाही. त्यामुळे गर्भधारणा टाळण्याचे हे नैसर्गिक मार्ग सोपे ठरतात. नैसर्गिकरित्या गर्भधारणा टाळण्यासाठी तुम्ही तुमचे शरीर समजून घेणे, लैंगिक इच्छांवर नियंत्रण मिळवणे, तसेच लैंगिक संबंध ठेवताना किती संयमीपणे वागता यावर अवलंबून असते. त्यामुळे दीर्घकाळापर्यंत केवळ नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धतींवर अवलंबून राहणे ही चांगली कल्पना किंवा पर्याय ठरत नाही. गर्भधारणा टाळण्यासाठी तुम्ही इतर गर्भनिरोधक पद्धतीचा वापर करू शकता. या पद्धती तुम्हाला लैंगिक जीवनाचा आनंद देण्याबरोबरच गर्भधारणा टाळण्याची खात्रीदेखील देतात. त्यामुळे कोणतीही नैसर्गिक गर्भनिरोधक पद्धती अवलंबताना तिचे फायदे आणि तोटे यांचा अभ्यास करा.
कधीकधी सर्व उपलब्ध गर्भनिरोधक पद्धतींमधून सर्वोत्तम पद्धत निवडणे गोंधळात टाकू शकते. आपल्यासाठी सर्वात योग्य अशी गर्भनिरोधक पद्धत निवडण्यासाठी डॉक्टरांशी चर्चा करणयाचा सल्ला दिला जातो. या गर्भनिरोधक पद्धती आणि कुटुंब नियोजनाबद्दल तुम्हाला जितकी जास्त माहिती असेल, तितके तुम्ही तुमच्या लैंगिक आरोग्यावर नियंत्रण ठेवू शकता. तुम्ही जितके नियंत्रणात असाल तितके तुम्हाला कुटूंब नियोजन करणे सोपे जाते. मातृत्व ही जीवनाला कलाटणी देणारी घटना आहे. त्यासाठी तुम्ही मुल कधी व्हावे यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. गर्भधारणा नको असेल तर ती टाळण्यासाठी गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करा. गरोदरपणाचा तणाव न घेता तो प्रवास आनंदात व्यतित करून आपल्या बाळाच्या भविष्याचा विचार करा.

सदस्य व्हा

आणि डॉ. वर्षाली माळी यांच्याकडून आरोग्यविषयक सूचना मिळवा.

तुमची सदस्यता जतन केली जाऊ शकली नाही. कृपया पुन्हा प्रयत्न करा.
तुम्ही डॉ. वर्षालीच्या स्त्रीरोग चिकित्सालयाच्या आरोग्य अपडेट्सचे यशस्वीपणे सदस्यत्व घेतले आहे.

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ

डॉ. वर्षाली माळी या प्रसुती शास्त्र आणि स्त्रीरोग शास्त्रात प्रवीण असून या क्षेत्रात कार्यरत आहेत. पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर डीएनबी (प्रसुतिशास्त्र व स्त्रीरोग शास्त्र) यामध्ये जिहांगीर हॉस्पिटल पुणे येथून पद्व्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच युनिवर्सिटी ऑफ श्लेस्विग होलस्टाइन, जर्मनी येथून गायनेकॉलॉजीकल एन्डोस्कोपी या विषयात डिप्लोमा पूर्ण केला आहे. प्रसुती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून त्यांना अनेक वर्षांचा गाढा अनुभव आहे. तसेच या विषयात त्या व्याख्याता म्हणूनदेखील मार्गदर्शन करतात. पुण्यातील मारुंजी येथील लाइफ रिपब्लिक टाउनशिपमध्ये त्यांचे चिकित्सालय असून हिंजवडी, वाकड आणि उपनगरांतील स्त्रियांना त्या वैद्यकीय सेवा देतात. हसतमुख आणि आश्वासक स्वभाव, प्रसुती आणि स्त्रीरोगांविषयी सखोल ज्ञान यामुळे स्त्रियांना त्यांचे मार्गदर्शन फायदेशीर आणि मदत करणारे ठरते आहे. डॉ. वर्षाली या दोन मुलींच्या आई असून मातृत्व ही सर्वांगसुंदर भेट असल्याचे त्या मानतात. आपले ज्ञान आणि शिक्षणाचा स्त्रियांना फायदा व्हावा यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.

प्रश्न?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूती डॉक्टरांना विचारा आणि उत्तरे मिळवा.

अपॉइंटमेंट

डॉ. वर्षाली माळी या अनुभवी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आहेत. तिच्यासोबत भेटीची वेळ बुक करा आणि सर्वोत्तम सल्ला, काळजी आणि उपाय मिळवा.
भाषा बदला. - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय