डॉ. वर्षाली माळी, एमबीबीएस, डीएनबी - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ.

प्रश्न आहे का?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभव प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञांना विचारा आणि त्वरित उत्तर मिळवा.
प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ यांना संदेश पाठवा - डॉ. वर्षाली माळी
2023-01-01 00:00:00 +0530

आमच्या ब्रॅण्डची ओळख कथा - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय

लेखक

चिकित्सालय टीम

डॉ. वर्षाली माळी यांचे स्त्रीरोग आणि प्रसूती चिकित्सालय
आमच्या ब्रॅण्डची ओळख कथा - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय
प्रत्येक ब्रॅण्डची एक कथा असते. एक छान रचलेली कथा, त्यांच्या जीवनाशी जोडलेली कथा आणि ब्रँडचा उद्देश परिभाषित करणारी कथा. आमच्याकडेही आमच्या ब्रँडची एक कथा आहे. साधी पण आमच्या हृदयाशी आणि आमच्या जगण्याच्या पद्धतीशी खोलवर जोडलेली आहे. आमच्या कथेतील तीन सुंदर पात्र आहेत. बाबा, आई आणि साहजिक सुंदर बाळ.

बाबा

गरोदरपण हा एक सुंदर प्रवास आहे. सुमारे नऊ महिन्यांचा प्रवास. पारंपारिकपणे, असे गृहीत धरले जाते की या प्रवासात वडिलांची जास्त भूमिका नसते किंवा किमान भावनिकदृष्ट्या बाबा व बाळ हे जास्त जोडलेले नसतात. आमचा यावर थोडाही विश्वास नाही. आम्हाला ही धारणा बदलायची आहे. फक्त आईनेच भावनिक चढ-उतार का अनुभवावेत ? का फक्त आईनेच ह्या प्रवासाचं आनंद घ्यावा? आयुष्यात ह्या एकदाचा मिळण्याऱ्या अनुभवाचा आनंद घ्येण्याचा हक्क वडिलांचा पण आहे. म्हणून आमच्या ब्रँड ओळखीचा अर्धा भाग वडिलांना समर्पित केला आहे.
बाबा - ब्रॅण्डची ओळख - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय
बाबा

आई

आई बाळाला आपल्या गर्भाशयात जपते. आई ही एक संरक्षक, बाळासाठी जीवनाचा स्रोत बनते. ज्या दिवसापासून तिला कळते की ती गरोदर आहे त्या दिवसापासून, ते बाळाचा सुंदर चेहरा बघायला मिळेपर्यंत, तिचे सारे आयुष्य तिच्या आत वाढणाऱ्या जीवनाभोवती फिरत असते. गरोदर असल्याची बातमी, पहिली सोनोग्राफी, पहिल्यांदा ऐकलेली बाळाच्या हृदयाची धडधड, पहिली बाळाची लाथ, ह्या सर्व भावनांच्या महासागरातून ती जाते. ती स्वतःला आनंदी ठेवते, सकस आहार खाते, काळजीपूर्वक चालते आणि बाळाला सर्वांत चांगले मिळावे यासाठी चुकीच्या गोष्टी दूर ठेवते. म्हणून, आमच्या ब्रँड ओळखीचा दुसरा अर्धा भाग, एक महत्त्वपूर्ण अर्धा भाग, आईला समर्पित केला आहे.
आई - ब्रॅण्डची ओळख - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय
आई

बाळ

अर्थातच, आमच्या कथेचा तिसरा भाग म्हणजे बाळ. नऊ महिने आईचा गर्भ हेच तिचे घर असते. ती उडी मारते, वळते, लाथ मारते आणि सर्व मजा करते. तिने तिच्या आईचा चेहरा आजून पाहिला नाही पण तिला माहित आहे की तिची आई प्रेमळ, काळजी घेणारी आहे. तिला माहित आहे की आई तिची वाट पाहत आहे. "तुला सर्दी होईल म्हणून मी हे आईस्क्रीम खाणार नाही" असे तिची आई जेंव्हा म्हणते तेव्हा बाळाला ते समजते. तिला कधी लाथ मारायची आणि कधी नाही हे माहित आहे (विशेषतः जेव्हा तिचे वडील तिच्या आईच्या पोटावर हात ठेवतात आणि म्हणतात, एकदा लाथ मर बाळा ). बाहेर येण्याची आणि पालकांना मिठी मारण्याची वाट पाहणारे बाळ आमच्या ब्रँड ओळखीचा मध्य भाग आहे.
बाळ - ब्रॅण्डची ओळख - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय
बाळ

हृदय

नऊ महिन्यांचा प्रवास प्रेमाने भरलेला असतो. बाळासाठी प्रेम, वडील आणि आई यांच्यातील प्रेम. एक पुरुष आणि एक स्त्री, एक पती आणि एक पत्नी, एक कुटुंबाचे स्वप्न पाहते. आई-वडील होण्याचे स्वप्न पाहते. म्हणून आमच्या ब्रँड ओळखीमधील वडील आणि आई यांचे दोन भाग हृदयाचा आकार तयार करतात. हृदय हे वडिलांचे आणि आईचे प्रेम दर्शवते. बाळासाठी प्रेम. एकमेकांसाठीचे प्रेम. ह्या हृदयाचा आकार फक्त प्रेमाचं नाही तर बाळासाठी संरक्षणात्मक आणि काळजी घेणारे कवच ही दर्शवते. म्हूणन आमची ब्रँड ओळख हृदयाचा आकार घेते व बाळाला त्या प्रेमाच्या, काळजीच्या कवच्यामध्ये सुरक्षित ठेवते. बाळ अर्थातच आईशी जास्त जोडलेले असते, तिच्यावर जास्त अवलंबून असते. म्हणून बाळ थोडे आईकडे दर्शवले आहे.
हृदय - ब्रॅण्डची ओळख - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय
हृदय

हृदयाचे ठोके

दोन हृदय एकत्र येणे, एकमेकांचा विचार करणे, एकत्र धाडकने ह्यापेक्षा चांगले नाते काय ? दोन मनांचे स्पंदनाने जोडले जाणे ह्यापेक्षा दुसरे चांगले जोडले जाणे काय? वडिलांच्या हृदयाचे ठोके हे आईच्या हृदयाच्या ठोक्याशी जोडले जाणे व बाळासाठी एक प्रेमाचे, काळजीएचे सुरक्षा कवच बनणे हीच आमच्या ब्रॅण्डची संपूर्ण गोष्ठ. बाळासाठीच्या प्रेमाची गोष्ठ. आई व बाबांच्या एकत्र प्रेमाची गोष्ठ.
हृदयाचे ठोके - ब्रॅण्डची ओळख - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय
हृदयाचे ठोके

आमचा उद्देश

या जगात जीवन आणण्याचा भाग होण्यापेक्षा अधिक समाधान कोणते आहे? हा प्रवास अविस्मरणीय बनवण्यापेक्षा चांगला उद्देश काय असू शकतो? डॉ. वर्षालीच्या स्त्रीरोग चिकित्सालयाचा उद्देश आहे:

"तणावमुक्त, सुरक्षित आणि आनंददायी गरोदरपणाचा प्रवास"

आणि हा उद्देश साकार करण्यासाठी अचूक निदान करणे, प्रभावी औषधोपचार देणे, वेळेवर उपचार दाणे आणि प्रत्येक भेटीत आणि संवादात हसू पसरवणे.

सूचना

आमची ब्रँड ओळख ट्रेड मार्क म्हणून नोंदणीकृत केली आहे आणि भारत सरकारद्वारे ट्रेड मार्क कायदा, १९९९ अंतर्गत संरक्षित केली आहे. आमच्या ब्रँड ओळखीची कोणत्याही प्रकारे प्रत बनवण्यास सक्त मनाई आहे आणि तसे केल्यास कायदेशीर कारवाई होईल.
ट्रेड मार्क अर्ज क्रमांक: ५२१७२३७
ट्रेड मार्क प्रमाण पत्र क्रमांक: २९८३११७
ट्रेड मार्क वर्ग: ४४
ट्रेड मार्क धारक: डॉ. वर्षाली माळी
ब्रॅण्डची ओळख - ट्रेड मार्क नोंदणी - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय
कॉपीराइट ट्रेड मार्क
आमच्या ब्रँड ओळख वापराबद्दल अधिक तपशीलांसाठी आमच्याशी संपर्क साधा. संपर्काचे सर्व मार्ग आमच्या संपर्क पृष्ठावर प्रदान केले आहेत.

लेखक

टीम

डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय

आपल्या रुग्णांना अधिक चांगली सुविधा देण्यासाठी ‘टीम डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय’ प्रयत्नशील आहे. रुग्णांपर्यंत सुविधा पोहोचविण्यासाठी संपूर्ण टीम एकसंघ होऊन काम करते. ही टीम विविध डिजिटल उपक्रमांचे काम करते. जसे की, अपॉइंटमेंट बूक करणे, वेबसाइट आणि सोशल मीडियावर माहिती उपलब्ध करून देणे. याचबरोबर चिकित्सालया मध्येदेखील ही टीम रुग्णांच्या सेवेसाठी सदैव कार्यरत असते. तेथे आलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना येथे काही अडचण येऊ नये यासाठी टीम प्रयत्नशील असते.
टीम आणि त्यांच्या कामाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आमचे चिकित्सालय, आमच्या वेबसाइटला भेट द्या किंवा सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करा. तुम्हाला माहिती देण्यात आणि तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्यात टीमला नक्कीच आनंद होईल.

सदस्य व्हा

आणि डॉ. वर्षाली माळी यांच्याकडून आरोग्यविषयक सूचना मिळवा.

तुमची सदस्यता जतन केली जाऊ शकली नाही. कृपया पुन्हा प्रयत्न करा.
तुम्ही डॉ. वर्षालीच्या स्त्रीरोग चिकित्सालयाच्या आरोग्य अपडेट्सचे यशस्वीपणे सदस्यत्व घेतले आहे.
सोशल मीडियावर फॉलो करा - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय

नवीन आरोग्य सूचना मिळवायच्या आहेत?

सोशल मीडियावर फॉलो करा

डॉ. वर्षाली माळी या स्त्रीरोग, प्रसूती, मुलींचे प्रौढत्व आणि महिलांचे आरोग्य विषयांवर लिहितात. आम्ही आमच्या रूग्ण आणि समुदायामध्ये आरोग्य विषयक जागरूकता पसरवण्यासाठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरतो.
अपडेट राहण्यासाठी आणि डॉ. वर्षाली माळी यांच्याकडून शिक्षण, आरोग्य सूचना इत्यादी मिळवण्यासाठी खालील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आम्हाला फॉलो करा.
सोशल मीडियावर फॉलो करा - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय

प्रश्न?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूती डॉक्टरांना विचारा आणि उत्तरे मिळवा.

अपॉइंटमेंट

डॉ. वर्षाली माळी या अनुभवी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आहेत. तिच्यासोबत भेटीची वेळ बुक करा आणि सर्वोत्तम सल्ला, काळजी आणि उपाय मिळवा.
भाषा बदला. - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय