डॉ. वर्षाली माळी, एमबीबीएस, डीएनबी - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ.

प्रश्न आहे का?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभव प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञांना विचारा आणि त्वरित उत्तर मिळवा.
प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ यांना संदेश पाठवा - डॉ. वर्षाली माळी
2022-01-26 00:00:00 +0530

स्त्रीरोग आणि प्रसूतीविषयक माहिती आता मराठीत

लेखक

चिकित्सालय टीम

डॉ. वर्षाली माळी यांचे स्त्रीरोग आणि प्रसूती चिकित्सालय
स्त्रीरोग आणि प्रसूतीविषयक माहिती आता मराठीत
आज, २६ जानेवारी म्हणजेच ‘भारतीय प्रजासत्ताक दिन’. या विशेष दिनी ‘डॉ. वर्षाली माळी यांचे स्त्रीरोग आणि प्रसूती चिकित्साल’ यांच्या वेबसाइटची मराठी आवृत्ती आपणा सर्वांसाठी घेऊन येत आहे. आरोग्यविषयक माहिती सर्वांना उपलब्ध व्हावी, हे डॉ. वर्षाली माळी यांचे ध्येय आहे आणि यासाठी त्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वेबसाइटच्या या मराठी आवृत्तीचा प्रवास कसा सुरू झाला, त्यामागील उद्देश काय, याविषयी ‘टीम डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्साल’ ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी डॉक्टर वर्षाली माळी, माहिती तंत्रज्ञान (आयटी) तज्ज्ञ आणि भाषा अनुवादक यांनी ही मोहीम कशी सुरू झाली याविषयीचे अनुभव आमच्यासोबत शेअर केले.

डॉ. वर्षाली माळी म्हणतात “आरोग्य शिक्षण पोहचावे घरोघरी”

माझं संपूर्ण बालपण एका खेडे गावात गेलं आणि शालेय शिक्षणही गावातच पूर्ण झालं. त्यानंतर पुण्यात येऊन मी वैद्यकीय शिक्षण घेतलं. विज्ञान शाखेची विद्यार्थिनी ते डॉक्टर या प्रवासात एक मोठे स्थित्यंतर मी पाहिले ते म्हणजे, मला कोणती भाषा कळते आणि मी कोणत्या भाषेत एखादा विषय किंवा संकल्पना सखोलपणे समजू शकते. माझ्या मते हे सगळ्यांच्या बाबतीत होत असेल. आपण ज्या भाषेत बोलतो आणि लिहितो ते समजून घेण्यासाठी आपले शिक्षण आणि आजूबाजूचा परिसर हे महत्वाचे निर्णायक घटक आहेत.
माझ्याकडे उपचारासाठी येणाऱ्या स्त्रियांसोबत रोज विविधांगी संवाद होत असतात. मित्रपरिवार, नातेवाईक आणि गावाकडील स्त्रिया आरोग्यविषयक सल्ला घेण्यासाठी माझ्याकडे येत असतात. या स्त्रियांना जेव्हा मी एखादा मुद्दा समजावून सांगत असते तेव्हा एक गोष्ट वारंवार जाणवते ती म्हणजे भाषेतील सहजता. बोलीभाषा किंवा साध्या शब्दात मुद्दा मांडला की, तो त्यांना लवकर समजतो आणि पटतोही.
एखादा विषय आपण एकत्र येऊन समजावून घेतला, चर्चा केली तर त्यावर मार्ग निघणे अधिक सोपे आणि फायदेशीर होते. एखाद्या विषयाची प्राथमिक किंवा साधारण माहिती असलेली व्यक्ती त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी माझ्याकडे येते तेव्हा मला अधिक आनंद होतो. कारण यावरूनच पुढील चर्चेला आधार मिळतो. स्त्रीरोग, गर्भधारणा, प्रसुति, महिलांचे आरोग्य आणि किशोरवयीन मुलींचे आरोग्य या विविध विषयांवर मी लेख लिहिले आहेत. या लेखांच्या माध्यमातून जगजागृती करण्याचा प्रयत्न असतो. ही सर्व माहिती माझी वेबसाइट, सोशल मीडिया यांच्या माध्यमातून पोहोचवली जाते. मात्र, ती सगळ्यांपर्यंत पोहोचत नाही याची खंत मला वाटत होती. ही आरोग्यविषयक जनजागृतीपर माहिती सर्व स्तरातील स्त्रियांपर्यंत पोहोचली तरंच हा उद्देश सफल होईल हा विचार केला आणि यातूनच ध्येय माझे मोठे झाले.
माझे ध्येय "ज्ञानाचा प्रसार" पासून "आरोग्य शिक्षण पोहचावे घरोघरी" पर्यंत विस्तारित झाले.
आपल्या ज्ञानाचा केवळ प्रसार न करता ते प्रत्येकाच्या उपयोगात कसे येईल यासाठी प्रयत्न सुरू झाले. माझी मातृभाषा मराठी आणि माझे काम करण्याचे ठिकाण पुणे आहे. त्यामुळे मायबोलीपासून या उपक्रमाची सुरुवात करायचे ठरले. खरंतर हे छोटं पाऊल आहे. मात्र, भविष्यात इतर प्रादेशिक भाषांमध्येदेखील ही माहिती आणि ज्ञान उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. मला आशा आहे की, आमचा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडेल. या विषयासंदर्भात कुतुहल असेल किंवा माहिती हवी असल्यास माझ्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. यावर चर्चा आणि मार्गदर्शन करायला मला आवडले. या उपक्रमातून ‘आरोग्य शिक्षण पोहचावे घरोघरी’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा आपण प्रयत्न करू.

विजय म्हणतात, “हे आव्हानात्मक; पण अशक्य अजिबात नाही.”

‘डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्साल’ यांच्या वेबसाइटचा डिजिटल व आयटी मार्गदर्शक म्हणून या विभागाची काळजी घेणे ही माझी जबाबदारी आहे. आरोग्यविषयक माहिती आणि ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी या डिजिटल व्यासपीठाचा योग्य उपयोग आम्ही करतो. डॉ. वर्षाली यांनी ‘आरोग्य शिक्षण पोहचावे घरोघरी’ ही संकल्पना जेव्हा आमच्यापुढे मांडली तेव्हा या कामाविषयी उत्सुकता वाढली आणि यातून काय परिवर्तन घडू शकते यावर चर्चा सुरू झाली. हा खरोखरच एक उत्तम उपक्रम आहे.
कुठल्याही वेबसाइटचे इतर भाषेत रुपांतर करताना अनेक आव्हाने आणि अडथळ्यांचा सामना करावा लागतो. आम्हालाही याचा अनुभव आला. ‘स्वयंचलित भाषा अनुवाद’ म्हणजेच तांत्रिक पद्धतीने मजकूर अनुवादित करण्याचा प्रयोग प्रभावी नाही हे आमच्या लक्षात आले. कारण यात मजकुराचा गाभाच हरवला जातो. अपॉइंटमेंट बूक करण्यासाठीदेखील आम्ही आमचे अॅप विकसित केले आहे. वेबसाइट किंवा अॅप वापरणाऱ्या व्यक्तीला अनुवादित केलेला मजकूर सहज समजावा यासाठी आम्हाला प्रत्येक संकल्पना इंग्रजीतून मराठीमध्ये रुपांतरित करावी लागणार होती. यासाठी अथक प्रयत्न आम्ही केले. यातील नवे बदल इंग्रजी आणि मराठी भाषेतील वाचकांच्या नक्कीच पसंतीस उतरतील. हे बदल त्यांच्या उपयोगी ठरणारे आहेत. अजूनही काही गोष्टी आणि लेख मराठीत रूपांतरित झालेले नाहीत. यावर आम्ही काम करीत आहोत आणि लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचा मानस आहे.

अश्विनी म्हणतात, “जनसामान्यांपर्यंत पोहोचणे शक्य होईल”

माझ्या एका सहकाऱ्याने डॉक्टर वर्षाली यांच्या कामाविषयी माहिती दिली. त्यानंतर विजय यांनी हे लेख मराठीत अनुवादित करण्याचा प्रस्ताव मांडला. गेली अनेक वर्षे मी संपादक आणि लेखक म्हणून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. बहुतांश स्त्रिया आरोग्यविषयक समस्या, त्यावरील उपाय यांबाबत अनभिज्ञ असतात याची जाणीव मलाही होती. त्यामुळे या लेखांमधून मिळणारी संवेदनशील माहिती नक्कीच त्यांच्यासाठी उपयोगी ठरेल याची खात्री झाली. विजय आणि माझ्यात झालेल्या चर्चेतून याचे सामाजिक महत्त्व लक्षात आले आणि हे ज्ञान केवळ स्त्रियाच नाही कुटुंबातील इतर सदस्यांपर्यंत पोहोचावे असा सूर या चर्चेतून निघाला. वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रात प्रामुख्याने इंग्रजी भाषेचा वापर होत असतो. बहुतांश लोकांना ही माहिती इंग्रजी भाषेतच उपलब्ध होते. मात्र, प्रादेशिक भाषा समजणाऱ्या, बोलणाऱ्या आणि जगणाऱ्या व्यक्तींसाठी हा मुख्य अडथळा ठरतो आणि त्यांच्यापर्यंत हे ज्ञान पोहोचत नाही. हे ज्ञान सर्व स्तरातील व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यात आपणही योगदान देऊन जनजागृतीचा खारीचा वाटा उचलू शकतो असे वाटले आणि या मराठी अनुवादाची सुरुवात झाली.
सर्व स्तरातील आणि वयोगटातील स्त्रियांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती व्हावी हा विचार यामध्ये दडलेला आहे. आजपासून ही माहिती मराठी वाचकांसाठी आम्ही खुली करीत आहोत. आज, २६ जानेवारी (भारतीय प्रजासत्ताक दिन) निमित्त या आवृत्तीचा पहिला टप्पा सुरू होतोय. वेबसाइटची भाषा निवडण्यासाठी भाषा अनुवाद बटणावर क्लिक करा आणि तुमची भाषा निवडा. संगणकावर, भाषांतर बटण वरच्या उजव्या कोपर्यात उपलब्ध आहे, मोबाइलवर, हे तळाशी डाव्या कोपर्यात उपलब्ध आहे.
भाषा अनुवाद पद्धत - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय
भाषा अनुवाद
आजमितीस सुमारे ४० लेख इंग्रजी भाषेत लिहिले आहेत. हे सर्व लेख टप्प्याटप्प्याने मराठीत अनुवादित करीत आहोत. इंग्रजीतील एखादा लेख मराठीत उपलब्ध नसेल तर त्याविषयीची सूचना तेथे देण्यात आलेली असेल. हे लेख मराठीत लवकरात लवकर आपल्याला उपलब्ध व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
आम्ही आशा करतो की, आपल्याला उपक्रम नक्कीच आवडेल. गर्भधारणा, प्रसुति आणि स्त्रियांच्या आरोग्य याविषयी मदत मिळण्यासाठी ही माहिती तुमच्या उपयोगी येईल. आपला मित्रपरिवार, नातेवाईक, गावाकडील स्त्रिया यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा आणि जनजागृतीच्या या मोहिमेत आमची साथ द्या.

लेखक

टीम

डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय

आपल्या रुग्णांना अधिक चांगली सुविधा देण्यासाठी ‘टीम डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय’ प्रयत्नशील आहे. रुग्णांपर्यंत सुविधा पोहोचविण्यासाठी संपूर्ण टीम एकसंघ होऊन काम करते. ही टीम विविध डिजिटल उपक्रमांचे काम करते. जसे की, अपॉइंटमेंट बूक करणे, वेबसाइट आणि सोशल मीडियावर माहिती उपलब्ध करून देणे. याचबरोबर चिकित्सालया मध्येदेखील ही टीम रुग्णांच्या सेवेसाठी सदैव कार्यरत असते. तेथे आलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना येथे काही अडचण येऊ नये यासाठी टीम प्रयत्नशील असते.
टीम आणि त्यांच्या कामाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आमचे चिकित्सालय, आमच्या वेबसाइटला भेट द्या किंवा सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करा. तुम्हाला माहिती देण्यात आणि तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्यात टीमला नक्कीच आनंद होईल.

सदस्य व्हा

आणि डॉ. वर्षाली माळी यांच्याकडून आरोग्यविषयक सूचना मिळवा.

तुमची सदस्यता जतन केली जाऊ शकली नाही. कृपया पुन्हा प्रयत्न करा.
तुम्ही डॉ. वर्षालीच्या स्त्रीरोग चिकित्सालयाच्या आरोग्य अपडेट्सचे यशस्वीपणे सदस्यत्व घेतले आहे.
सोशल मीडियावर फॉलो करा - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय

नवीन आरोग्य सूचना मिळवायच्या आहेत?

सोशल मीडियावर फॉलो करा

डॉ. वर्षाली माळी या स्त्रीरोग, प्रसूती, मुलींचे प्रौढत्व आणि महिलांचे आरोग्य विषयांवर लिहितात. आम्ही आमच्या रूग्ण आणि समुदायामध्ये आरोग्य विषयक जागरूकता पसरवण्यासाठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरतो.
अपडेट राहण्यासाठी आणि डॉ. वर्षाली माळी यांच्याकडून शिक्षण, आरोग्य सूचना इत्यादी मिळवण्यासाठी खालील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आम्हाला फॉलो करा.
सोशल मीडियावर फॉलो करा - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय

प्रश्न?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूती डॉक्टरांना विचारा आणि उत्तरे मिळवा.

अपॉइंटमेंट

डॉ. वर्षाली माळी या अनुभवी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आहेत. तिच्यासोबत भेटीची वेळ बुक करा आणि सर्वोत्तम सल्ला, काळजी आणि उपाय मिळवा.
भाषा बदला. - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय